31.3 C
Ratnagiri
Friday, May 24, 2024

विनाकारण त्रास द्याल तर गप्प बसणार नाही आ. अनिल परबांचा इशारा

विनाकारण त्रास द्याल, खोटे गुन्हे दाखल कराल...

रत्नागिरीजवळ अपघात रिक्षाचालकाचा मृत्यू

रिक्षाचे ब्रेक निकामी झाल्याने रिक्षा पलटी होऊन...

दापोलीतील महिलेच्या मृत्यूचे गूढ वाढले, नातेवाईकांना घातपाताचा दाट संशय

तालुक्यातील वणंद येथील ५० वर्षीय महिलेच्या मृत्यूचे...
HomeRajapurगेल्या १० वर्षांत सामान्य जनतेच्या जगण्या मरण्यावर जीएसटी आकारल्याचा जाब विचारा

गेल्या १० वर्षांत सामान्य जनतेच्या जगण्या मरण्यावर जीएसटी आकारल्याचा जाब विचारा

इंडिया आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांना राजापूर तालुक्यात मोठी प्रतिसाद मिळत आहे.

गेल्या १० वर्षाच्या कारकिर्दीत देशवासियांच्या जगण्या-मरण्यावर जीएसटी आकारण्यात आला. फक्त स्वप्नांवर जीएसटी लावण्याचा पर्याय नसल्याने भारतीय जनता पार्टी आणखी ५ वर्षे सत्ता भोगण्यासाठी त्याच जनतेला नवनव्या क्ल्पुत्यांनी स्वप्ने दाखवून मुर्ख ठरवण्याचा प्रयत्न करीत आहे. गेल्या १० वर्षात भाजपाच्या नेत्या-पदाधिकाऱ्यांशिवाय सामान्य जनतेचे जीवन सुकर झाले आहे का? असा सवाल राजापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष किशोर नारकर यांनी उपस्थित केला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

आज प्रत्येकाच्या घरात वृध्द् आईवडील आहेत. त्यांची रेल्वेतील अर्ध्या किंमतीतील प्रवासाची सवलत कोणी बंद केली? आमचे आराध्य दैवत असलेले श्री प्रभु रामचंद्र यांचा जन्म २२ जानेवारी २०२४ झाली झाल्याचा दिंडोरा पिटला जात आहे. म्हणजे आम्ही यापूर्वी दर दिवशी ज्या प्रभुरामचंद्राची पूजा करीत होतो ती अनाठायी होती का? याचा जाब दरवाजात येणाऱ्या अंधभक्तांना विचारा, असेही आवाहन नारकर यांनी केले.

गॅस सिलेंडर दाखवा – भक्त संज्ञेत सगळीच जनता बसत नाही. सामान्य जनतेने त्यांच्या दारात मतांसाठी येणाऱ्या भाजपाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना स्वयंपाक घरात नेऊन गॅस सिलेंडर दाखवावा. रेल्वे स्थानक मोठ्या उद्योगपतींना देताना ज्येष्ठ नागरिकांची रेल्वे सवलत का बंद केली याचा जाब विचारावा, महागाईबाबत तुमचे मत काय आहे हे विचारावे आणि मोदींच्या मते देश म्हणजे कागदावरील प्रगती की प्रत्यक्ष देशवासीय जनतेची हालत हा प्रश्न उपस्थित करावा असे आवाहन राजापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष किशोर नारकर यांनी केले. नारकर सध्या राजापूर तालुकाभरात इंडिया आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ सभा घेत आहेत.

राऊतांना उदंड प्रतिसाद – त्यांनी सांगितले की, इंडिया आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांना राजापूर तालुक्यात मोठी प्रतिसाद मिळत आहे. काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि शरदचंद्र पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांची इंडिया आघाडीसाठी झालेली एकजूट ही ऐतिहासिक आहे. भाजपाची ‘चारशे पार’ ही घोषणा म्हणजे भारतीय जनतेला आधीच गृहित धरलेल्या त्यांच्या ‘मन की बात’ला काही किंमत नाही. ५ वर्षांनंतर मतदानाची संधी मि ळणाऱ्या मतदारांना असलेल्या त्यांच्या वैचारिक मतापेक्षा गुलामगिरीसदृष्य आधारित हे भाकित आहे.

सरकारने काय केले? – आता मतदानांला काही दिवसांच्या अवधी आहे. गोरगरीब जनतेची चूल पेटावी यासाठी भाजपाच्या सरत्या सरकारने काय केले? ५ किलो मोफत धान्य ही देशातील जनतेची पुढील ५ वर्षांसाठी लायकी आहे का ? मग वाढलेली इंधनांची किंमत, त्याद्वारे वाढलेली महागाई, स्वयंपाकाच्याच गॅसचीच वाढलेली अडीचपट किंमत, त्यासाठी बंद केलेली सबसिडी, ज्येष्ठ. नागरिकांची रेल्वे प्रवासातील बंद केलेली अर्ध्या किंमतीतील सवलत पण त्याच्या जोडीलाच १६ लाख कोटींचे आपल्या मित्रवर्य उद्योगपतींचे माफ केलेले कर्ज यावरदेखील सामान्य मतदार आज प्रश्न उपस्थित करीत आहेत ही जागृती सामान्य जनतेचे मन नव्हे तर मत परिवर्तन करीत आहे, असा दावा किशोर नारकर यांनी केला.

RELATED ARTICLES

Most Popular