27 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

कोकणातील मच्छीमार सहकार संस्था बंद होण्याच्या स्थितीतः आ. साळवी

रत्नागिरी जिल्हयातील मच्छीमारांच्या समस्या व मागण्यांबाबत मत्स्यव्यवसाय...

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होणार, वीर ते चिपळूण पहिला टप्पा करण्याचा निर्धार

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण टप्प्याटप्यांनी करण्याचा निर्णय घेण्यात...

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे कमावण्याचे आमिष दाखवुन फसवणूक

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे मिळवून देण्याचे...
HomeRatnagiriरत्नागिरीचे माजी पालकमंत्री रविंद्र वायकर यांच्या घरावर ईडीची धाड

रत्नागिरीचे माजी पालकमंत्री रविंद्र वायकर यांच्या घरावर ईडीची धाड

जोगेश्वरीतील भूखंड घोटाळाप्रकरणी ईडीकडून ही धाड टाकण्यात आल्याचे समजते.

ठाकरे गटाचे नेते आणि उद्धव ठाकरे यांची विश्वासू सहकारी, रत्नागिरीचे भूतपूर्व पालकमंत्री आ.रवींद्र वायकर यांच्या जोगेश्वरी येथील घरी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) धाड टाकली आहे. ईडीच्या पथकाने मंगळवारी सकाळी वायकर यांच्या घरावर धाड टाकली. ईडीच्या या पथकात १० ते १२ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. प्राथमिक माहितीनुसार, सकाळी साधारण साडेआठच्या सुमारास ईडीचे पथक वायकर यांच्या घरी पोहोचले. त्यानंतर वायकर यांच्या घरी ईडीची झाडाझडती सुरु होती.

वायकरांशी संबंधित ७ ठिकाणांवर ईडीची छापेमारी सुरु असून यामध्ये त्यांच्या भागिदारांच्या घरांचाही सम ावेश आहे. जोगेश्वरीतील भूखंड घोटाळाप्रकरणी ईडीकडून ही धाड टाकण्यात आल्याचे समजते. आता या धाडीत ईडीच्या हाती काय लागते याकडे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील आमदार अपात्रतेचा निर्णय बुधवारी येत असल्याच्या पार्श्वभूमिवर आदल्या दिवशीच ठाकरे गटाच्या एका नेत्याच्या घरावर ईडीचे पडलेले छापे हे राजकीय सूड बुद्धीचे राजकारण असल्याचा आरोप होतो आहे.

ईडीच्या रडारवर – यानिमित्ताने ठाकरे गटाचा आणखी एक नेता ईडीच्या कचाट्यात सापडला आहे. यापूर्वी संजय राऊत, अनिल परब या ठाकरे गटातील नेत्यांच्या घरी ईडीच्या धाडी पडल्या होत्या. यापैकी संजय राऊत यांना ईडीने अटक केली होती आणि त्यांना तब्बल तीन महिने तुरुंगात राहावे लागले होते. त्यानंतर रवींद्र वायकर यांचे नाव सातत्याने चर्चे त होते. रवींद्र वायकर यांची यापूर्वी ईडी चौकशी झाली होती.

किरीट सोमय्यांचा आरोप – भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रवींद्र वायकर यांच्यावर कथित आर्थिक गैरव्यवहाराचे अनेक आरोप केले होते. उद्धव ठाकरे आणि रवींद्र वायकर यांचे व्यावसायिक हितसंबंध असल्याचे सोमय्या यांनी म्हटले होते. परंतु, वायकर यांच्याविरोधात कोणतीही ठोस कारवाई झाली नव्हती. मात्र, मंगळवारी ईडीच्या पथकाने वायकर यांच्या घरावर धाड टाकून निर्णायक कारवाईच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले आहे. शिवसेना आम दारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांसमोर असलेल्या सुनावणीचा निकाल बुधवारी जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर ईडीची रवींद्र वायकर यांच्याविरोधातील कारवाई सूचक आणि महत्त्वाची मानली जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular