27.4 C
Ratnagiri
Thursday, April 25, 2024

माझ्या जीवात जीव असेपर्यंत काम करत राहणारः सुनिल तटकरे

निवडणूका येतात जातात, मात्र आम्ही जनतेच्या कामासाठी...

अमित कदम यांचा राष्ट्रवादी पवार गटात कार्यकर्त्यांसह प्रवेश

महाराष्ट्रीय यादव चॅरिटेबल ट्रस्टचे श्रीकृष्ण हॉल, नायगाव...

…तर बेरोजगारी कशी दूर होणार, प्रमोद जठार

महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने जाहीरनाम्यामध्ये...
HomeMaharashtraईडीची शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्यावरच थेट कारवाई

ईडीची शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्यावरच थेट कारवाई

ईडीने आज अचानक एवढी मोठी कारवाई करत संजय राऊतांना एक प्रकारे दणका दिला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून ईडी आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात सुरु असलेला लपंडाव अखेर संपुष्टात आला आहे. आता थेट ईडीनं शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्यावरच कारवाई केली आहे. याआधी संजय राऊत यांचे बंधू सुनिल राऊत यांच्यावर देखील करण्यात आलेल्या ईडीच्या कारवाई बाबत जोरदार वाद झालेले.

संजय राऊत यांच्या अलिबागमधील ८ प्लॉट आणि मुंबईतील राहत्या फ्लॅटवर ईडीकडून जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. त्यासंदर्भात आता विरोधीपक्ष असलेल्या भाजपाकडून संजय राऊतांना लक्ष्य केलं जात असल्याची चर्चा आहे. मुंबईतील १ हजार ०३४ कोटींच्या कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांची चौकशी होऊन त्यांना अटक देखील झाली होती. त्यासंदर्भात करण्यात आलेल्या तपासात याच घोटाळ्यातील पैसाचा वापर संजय राउत यांनी अलिबाग मधील मालमत्ता खरेदी करण्यासाठी केल्याचा संशय ईडीला आहे.

गोरेगाव पश्चिमेतील सिद्धार्थनगर भागातील या झोपडपट्टीचे काम न करताच परस्पर काही वर्षांपूर्वी इथला एफएसआय बेकायदेशीररित्या विकण्यात आला. जवळपास १ हजार कोटी रुपयांचा तो व्यवहार होता. एचडीआयएलच्या प्रमोटर्सना पैशांची अफरातफर करण्यात मदत केली,  असा आरोपही प्रवीण राऊत यांच्यावर आहे. यासंदर्भात ईडीनं कारवाई केली असल्याचं सांगितलं जात आहे.

ईडीने आज अचानक एवढी मोठी कारवाई करत संजय राऊतांना एक प्रकारे दणका दिला आहे. अलिबाग मधील एकूण ८ प्लॉट आणि दादर मधील राहत असलेला एक फ्लॅटवर ईडीने टाच आणली आहे. गोरेगाव झोपडपट्टी प्रकरणी प्रवीण राऊत यांची जवळपास ७२  कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. यांनतर आता संजय राऊतांच्या पत्नीशी संबंधित जागांवर देखील ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular