26.8 C
Ratnagiri
Saturday, December 9, 2023

गंजलेल्या खांबावर विद्युत वाहिन्या , मोडकाआगारमधील स्थिती

मोडकाआगर येथील नारळ, सुपारी व काजूच्या बागेतील...

पक्षाच्या कोकणातील नेत्यांना संपवण्याचा विडा – रामदास कदम

कोकणातील पक्षाच्या नेत्यांना संपवण्याचा विडा उद्धव ठाकरे...

श्रमदानातून बंधारे उभारल्याने एक कोटीची बचत – पाणी जिरवा मोहीम

पाण्याची बचत व साठवण केल्यास त्याचे उन्हाळ्यात...
HomeEntertainment२०२० मध्ये गुगलने रश्मिका मंदानाचे नाव नॅशनल क्रश म्हणून घोषित

२०२० मध्ये गुगलने रश्मिका मंदानाचे नाव नॅशनल क्रश म्हणून घोषित

रश्मिकाने तिच्या कारकिर्दीत आतापर्यंत केवळ १४ चित्रपट केले आहेत,  परंतु पदार्पणाच्या ४-५ चित्रपटांनंतरच तिचे संपूर्ण भारतभर चाहते झाले आहेत.

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री उर्फ नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी रश्मिका मंदाना हिचा आज वाढदिवस. तिने वयाची २६ वर्षे पूर्ण केली आहेत. रश्मिकाने तिच्या कारकिर्दीत आतापर्यंत केवळ १४ चित्रपट केले आहेत,  परंतु पदार्पणाच्या ४-५ चित्रपटांनंतरच तिचे संपूर्ण भारतभर चाहते झाले आहेत. रश्मिकाच्या क्यूटनेस, सौंदर्याने, डोळ्याच्या दिलखेचक अदांनी चाहत्यांना अक्षरशा वेड लावले आहे. कर्नाटकमध्ये, रश्मिकाचे टोपणनाव नॅशनल क्रश आहे. तर तिला एक्सप्रेशन क्वीनदेखील म्हटले जाते.

कर्नाटकातील विराजपेट येथे ५ एप्रिल १९९६ रोजी जन्मलेल्या रश्मिकाने मानसशास्त्रामध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे. रश्मिकाचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला,  तिचे वडील मदन मंदाना हे क्लार्क म्हणून काम करायचे. रश्मिकाने २०१६ मध्ये प्रथम ‘किरिक पार्टी’  या कन्नड चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. अवघ्या ४ कोटी रुपयांमध्ये बनलेल्या या चित्रपटाने तब्बल ५० कोटींचे कलेक्शन केले आणि हा चित्रपट २०१६ सालामधील सर्वाधिक कमाई करणारा कन्नड चित्रपट ठरला.

अवघ्या ७ वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये रश्मिकाने केवळ १४ चित्रपट केले असून त्यापैकी बहुतांश सुपर डूपर हिट ठरले आहेत. रश्मिका २०२१ मध्ये आलेल्या पुष्पा चित्रपटातील तिच्या दमदार व्यक्तिरेखेसाठी देखील ओळखली जाते. इंस्टाग्रामवर रश्मिकाचे ३ कोटी फॉलोअर्स आहेत. गुगलने तिचे नाव २०२० मध्ये नॅशनल क्रश म्हणून घोषित केले आहे. गुगलवर नॅशनल क्रश या कीवर्डने सर्च केल तर रश्मिकाचा फोटो दिसतो.

‘पुष्पा’ या चित्रपटानंतर रश्मिकाने टॉलिवूडसह बॉलिवूडमध्येही आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. आता ही अभिनेत्री दक्षिणेतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एकमेव ठरली आहे. विशेष म्हणजे रश्मिका तिच्या एका चित्रपटासाठी ३-४ कोटी रुपये घेते. वेगवेगळ्या चित्रपटांतील साकारलेल्या भूमिकेसाठी रश्मिकाला आतापर्यंत ६ वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular