29.8 C
Ratnagiri
Sunday, June 8, 2025

कोकण मार्गावर तुतारी एक्स्प्रेस चोरट्यांच्या ‘हिटलिस्ट’ वर !

कोकण मार्गावर रेल्वेगाड्यांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या विशेषतः...

दररोज कचरा द्या, बक्षीस गुण मिळवा, चिपळूण पालिकेचा उपक्रम

शहरातील स्वच्छता आणि घनकचरा संकलन मोहिमेत चिपळूण...

गांजा प्रकरणी आणखी एकाला अटक – महाड कनेक्शन

गांजा विक्री प्रकरणातील मुख्य सूत्रधाराच्या मागावर येथील...
HomeMaharashtraयेत्या शैक्षणिक वर्षापासून मराठी शाळांतून पहिलीपासून एकात्मिक आणि द्वैभाषिक अभ्यास पद्धती

येत्या शैक्षणिक वर्षापासून मराठी शाळांतून पहिलीपासून एकात्मिक आणि द्वैभाषिक अभ्यास पद्धती

हल्ली सर्व पालकांचा आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये घालण्याकडे कल दिसून येत आहे. आत्ता नवीन नियमाप्रमाणे राज्यामध्ये प्रत्येक शाळातून मराठी भाषेतून शिक्षण अनिवार्य केले आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये बालपणापासूनच मराठीसोबतच इंग्रजीतील संकल्पना स्पष्ट होण्यासाठी, येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील सर्व मराठी माध्यम शाळांतून पहिलीपासून एकात्मिक आणि द्वैभाषिक अभ्यास लागू करण्यात येईल,  असे शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.

विद्यार्थ्यांना मराठी बरोबरच इंग्रजी भाषेतील संज्ञा, संकल्पना अधिक सुस्पष्ट होण्यासाठी,  इंग्रजी भाषेतील शब्दांची ओळख व्हावी, इंग्रजी भाषेवर सुद्धा मातृभाषेप्रमाणे प्रभुत्व येण्यासाठी प्रा. वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली एका बैठक घेण्यात आली होती. यावेळी शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाचे बालभारतीचे संचालक विवेक गोसावी हे प्रत्यक्ष तर शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक देवेंद्र सिंग, माध्यमिकचे शिक्षण संचालक महेश पालकर, प्राथमिकचे शिक्षण संचालक दिनकर टेमकरही  ऑनलाईन उपस्थित होते.

मातृभाषा वेगळी असेल आणि शाळेच माध्यम वेगळ असेल तर सुरुवातीला मुले बावरून जातात. आपल्याला इंग्रजी भाषा कळेल कि नाही, बोलता, लिहिता येईल का? याबाबत थोडासा येणारा बुजरेपणा विद्यार्थ्यांमध्ये येऊ नये यासाठी मुलांच्या शिक्षणाचा पाया भक्कम करणे गरजेचे आहे. त्यासाठी मराठी माध्यम शाळांमधून पहिलीपासून विशेषकरून या दोन्ही एकात्मिक आणि द्वैभाषिक अभ्यास पद्धती लागू करण्यात येणार आहेत. जेणेकरून, इंग्रजी विषयाच्या ज्ञानात सुद्धा मोठ्या प्रमाणात भर पडेल आणि भविष्यामध्ये त्याचा योग्य वापर करता येईल.

RELATED ARTICLES

Most Popular