23.3 C
Ratnagiri
Friday, February 7, 2025

कमी बजेटमध्ये प्रचंड कमाई करणारा साऊथचा अप्रतिम सस्पेन्स चित्रपट…

आजकाल, ओटीटीवर ॲक्शन थ्रिलर चित्रपट पाहण्याची आवड...

चिपळूण पंचायत समितीने थकवले १ लाख २१ हजार…

मार्च महिना जवळ आला की, सर्व आस्थापनांना...

कोळकेवाडीतील खोदकामांमुळे वाड्यांना धोका – पाणी योजनेसाठी काम

कोळकेवाडी धरणातून सायफनद्वारे तालुक्यातील अडरे, अनारी परिसरातील...
HomeMaharashtraशैक्षणिक क्षेत्राला सुद्धा, आता महागाईची झळ !

शैक्षणिक क्षेत्राला सुद्धा, आता महागाईची झळ !

शैक्षणिक अभ्य्साक्रमासाठी लागणाऱ्या वह्या, पुस्तकांच्या किंमती वाढल्याने पालकांच्या अडचणी वाढणार आहेत.

देशात सध्या महागाई भडका उडालेला दिसत आहे. कोरोनामुळे देशासह जगभरातील इतर देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे.लवकरच नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार आहे. एकीकडे घरगुती सिलेंडर, भाज्या, कडधान्ये, तेल, पेट्रोल, डिझेलचे भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. तर दुसरीकडे आता या महागाईचा परिणाम शैक्षणिक पातळीवरही होत आहे.

शैक्षणिक अभ्य्साक्रमासाठी लागणाऱ्या वह्या, पुस्तकांच्या किंमती वाढल्याने पालकांच्या अडचणी वाढणार आहेत. अवघ्या दोन आठवडयानंतर नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत आहे. मात्र यंदाच्या वर्षी वह्या पुस्तके खरेदी करायला जाताना, खिशाला चांगलीच झळ बसणार आहे. वह्या आणि पुस्तके तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किंमतीमध्ये कोरोना काळात प्रचंड वाढ झाल्याने तसेच कागदाच्या प्रतिकिलो दरामध्ये देखील वाढ झाली आहे.

शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि पालकांची आता पावसाळ्या आधी सर्व साहित्याची खरेदी करण्याची धावपळ सुरु होईल. अगदी पेन, पेन्सिल, वह्या, पुस्तकांपासून गणवेशापर्यंत सगळी खरेदीची धावपळ सुरु होईल. मात्र देशातील वाढत्या महागाईचा फटका आता शालेय जीवनावरही होणार आहे. महागाईचा परिणाम अभ्यासावरही होणार आहे. यावर्षी तुम्ही वह्या पुस्तके खरेदी करायला जाताय तर तुम्हाला खिशाला कात्री लागणार आहे. आता शालेय साहित्याच्या किंमती मध्येही वाढ झाली आहे. वह्या आणि पुस्तकांच्या किमतीमध्ये २० ते ३० टक्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे शैक्षणिक खर्चाचा भार वाढणार असल्याचं चित्र आहे.

कोरोना काळात वह्या आणि पुस्तके बनवण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे याचा भार आता शालेय जीवनावर पडणार आहे. शैक्षणिक वस्तू आणि साहित्याचे दरावर जीएसटीही वाढवल्याने उत्पादकांना देखील दर वाढवावे लागले आहेत. त्यामुळे याचा सर्वाचा फटका वह्या आणि पुस्तकांच्या किंमतीना बसणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular