26.1 C
Ratnagiri
Tuesday, October 14, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeMaharashtraहिवाळी अधिवेशन एक आठवडा पुढे ढकलण्याची सर्व पक्षांची मागणी

हिवाळी अधिवेशन एक आठवडा पुढे ढकलण्याची सर्व पक्षांची मागणी

विधान परिषदेच्या सहा जागांसाठी येत्या १० डिसेंबरला निवडणूक होत असून, मतमोजणी १४ डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे. या निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसाठी राजकीय पक्षांचे नेते काही काळ या कामात व्यस्त असणार आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी हिवाळी अधिवेशन एक आठवडा पुढे ढकलावे याबाबत मागणी केल्याचे समजते. सर्वच राजकीय पक्षांनी केलेल्या मागणीनुसार अधिवेशन एक आठवडा पुढे ढकलण्यात येणार असल्याचे कळते आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर आज त्यांना रुग्णालयातून डीस्चार्ज्ड मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वैद्यकीय उपचारानंतर सध्या विश्रांती घेत असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत लवकरच कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार असून त्यात हिवाळी अधिवेशन मुंबई की नागपूर यापैकी नेमक्या कोणत्या ठिकाणी आणि कधी होणार याबाबत अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचे समजते.

महाराष्ट्रातून कोरोनाचे अजून समूळ उच्चाटन झालेले नसल्याने, मागील २ वर्षाप्रमाणे कोरोना नियामंचे जसे पालन अनिर्वाय करण्यात आले होते त्याप्रमाणेच आगामी हिवाळी अधिवेशनावरही कोरोनाचे सावट कायम असल्याने अधिवेशनात सहभागी होणाऱ्या विधिमंडळ सदस्यांपासून तर कर्मचाऱ्यांपर्यत सर्वांना लसीकरणाचे दोन डोस पूर्ण असणे बंधनकारक असेल. त्यामुळे अधिवेशनासाठी येणाऱ्या प्रत्येकाला आपल्यासोबत दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र बाळगणे बंधनकारक करण्यात आले आहे.

विधानभवन परिसरात सभागृह सदस्यांच्या स्वीय सहायकांना प्रवेश दिला जाणार नाही. डोस घेतला असला तरी आरटीपीसीआर चाचणी आवश्यक राहील. शासनाने कोरोना संदर्भात जि नियमावली आखून दिली आहे त्याचे काटेकोरपणे पालन करणे हि प्रत्येकाची जबाबदारी असून, कोरोनाचा संसर्ग पूर्ण नष्ट करणे यामुळे शक्य होणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular