24.8 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeRatnagiriरत्नागिरी बसस्थानकात वृद्ध ठार…

रत्नागिरी बसस्थानकात वृद्ध ठार…

एसटी चालकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

एसटी महामंडळाच्या बसस्थानकाच्या शहरातील लोकार्पणानंतर दुसऱ्याच दिवशी प्रवाशाचा बळी गेला. भाट्ये येथून बसस्थानकात जाणाऱ्या एसटीच्या मागच्या चाकाखाली वृद्ध प्रवासी चिरडला. कमलाकर बाबाजी चव्हाण (वय ८२, रा. चव्हाणवाडी, जुवे, रत्नागिरी) असे त्यांचे नाव आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले असून, संशयित एसटी चालकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. बापू कोंड्या आखाडे (वय ५५, जाकादेवी, रत्नागिरी) असे संशयित एसटी चालकाचे नाव आहे. हा अपघात मंगळवारी (ता. १३) सकाळी साडेअकराच्या सुमारास येथे घडला. एसटी बसस्थानक पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वृद्ध प्रवासी कमलाकर बाबाजी चव्हाण (वय ८२, रा. चव्हाणवाडी, जुवे, रत्नागिरी) हे सकाळी रत्नागिरी बाजारपेठेत आले होते.

बसस्थानकासमोरील औषध दुकानातून गोळ्या घेऊन ते घरी जाण्यासाठी नवीन एसटी डेपोत जात होते. त्याचवेळी भाट्ये रस्त्याच्या दिशेने येणारी बस (एमएच १४ बीटी २७५७) वरील चालकाने निष्काळजीपणे बस चालवून वृद्ध चव्हाण यांना समोरून ठोकर दिल्याने ते खाली पडले व बसच्या मागच्या चाकाखाली गेल्याने त्यांच्या दोन्ही पायावरून चाक गेले. काही काळ नव्याने सुरू झालेल्या बसस्थानकात घबराट निर्माण झाली. प्रवाशांनी घटनास्थळी गर्दी केली होती. जखमी चव्हाण यांना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते; मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. याची माहिती रिक्षाचालक त्यांचा मुलगा शैलेंद्र कमलाकर चव्हाण (चव्हाणवाडी, जुवे-रत्नागिरी) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलिसांनी संशयित बसचालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवून वृद्धाच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल हरचकर करत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular