24.6 C
Ratnagiri
Monday, December 9, 2024

Huawei च्या Mate 70 मालिकेला प्रचंड मागणी, 67 लाखांहून अधिक युनिट्सचे बुकिंग

चीनी स्मार्टफोन निर्माता Huawei ने गेल्या महिन्यात...

शाहीद कपूरसोबत नॅशनल क्रश तृप्ती डिमरी झळकणार एका नव्या चित्रपटात

तृप्ती डिमरीचा यशस्वी प्रवास - तृप्ती डिमरीने...

IND vs AUS दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव

ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या पिंक बॉल कसोटी सामन्यात...
HomeChiplunअनुभवी आणि थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संपर्क ठेवणाऱ्या नारायण राणेंना निवडून द्या : आ. नितेश राणे

अनुभवी आणि थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संपर्क ठेवणाऱ्या नारायण राणेंना निवडून द्या : आ. नितेश राणे

चिपळूणमध्ये दाखल होत असतानाच नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर झाली.

गेल्या १० वर्षातील ७ वर्ष खासदार विनायक राऊत हे सत्तेत राहिले. तरीदेखील त्यांना या मतदारसंघासाठी काहीच करता आले नाही. सतत रडत राहायचे आणि एखादा चांगला प्रकल्प आला की लगेच विरोधाची भूमिका घ्यायची, हेच काम त्यांनी गेल्या १० वर्षात केले आहे. त्यामुळे नेहमीच नकारात्मक दुष्टीकोन ठेवणाऱ्या खासदाराला यावेळी संधी देऊ नका, तर अनुभवी व थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संपर्क ठेवणारे उमेदवार म्हणून नारायण राणे यांच्या पाठीशी उभे रहा, असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी केले. कणकवलीचे आमदार नितेश राणे गुरुवारी चिपळूणमध्ये आले होते. चिपळूणमध्ये दाखल होत असतानाच नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर झाली. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा चव्हाण, तालुकाध्यक्ष वसंत ताम्हणकर, माजी नगरसेवक विजय चितळे, परिमल भोसले यांच्यासह अनेक’ पदाधिकारी उपस्थित होते. आ. नितेश राणे यावेळी म्हणाले की, भाजपच्या मतांमुळेच विनायक राऊत दोनवेळा खासदार झाले. गेल्या १० वर्षात त्यांनी कोणता एखादा प्रकल्प कोकणात आणला किंवा रोजगार उपलब्ध होईल त्यासाठी प्रयत्न केले? अजिबात काहीही केलेले नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महामार्ग चौपदरीकरण ९९ टक्के पूर्ण झाले मग रत्नागिरी जिल्ह्यात का रखडले? मग येथील खासदार दिल्लीत करतात तरी काय? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.

विनायक राऊत यांनी अद्यापपर्यंत जितकी कामे केली ती सर्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच झालेली आहेत. राऊतांचे पक्षप्रमुख स्वतः जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यावेळी देखील त्यांना कोकणासाठी काहीच करता आले नाही. त्यामुळे आता विनायक राऊत मते मांगायला आले तर त्यांना सांगा तुम्हाला १० वर्ष संधी दिली आता बस झाले. पुढील खासदार हा नारायण राणे यांच्यासारखा अनुभवी व वजनदार असा निवडून देऊ असे.

ठामपणे सांगा असे आवाहन देखील त्यांनी मतदारांना केले. राणे साहेबांवर लोकांचा प्रचंड विश्वास आहे. कारण ते जे बोलतात से करून दाखवतात. दिल्लीत विनायक राऊत यांना वेळ मागावी लागते, तर नारायण राणे यांना वेळ दिली जाते हा मोठा फरक आहे. अशा नेतृत्वाला जर तुम्ही निवडून दिलात तर येथील एक ही प्रश्न शिल्लक राहणार नाही. या मतदारसंघाचा कायापालट झालेला तुम्हाला येत्या ५ वर्षात दिसून येईल अशी हमी देखील त्यांनी यावेली दिली.

RELATED ARTICLES

Most Popular