नुकत्याच झालेल्या नगर पालिका निवडणूकीत महायुतीने महाविकास आघाडीला धूळ चारत घवघवीत यश मिळवले. परंतु या निवडणुकीत त्या प्रभागात झालेल्या एकुण मतांच्या एक अष्टमांशपेक्षा मतदान झालेल्या ३० जणांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. यातून पालिकेच्या तिजोरीत ४५ हजाराची भर पडली आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार संबंधित प्रभागात झालेल्या एकुण मतांच्या किमान अष्टमांश (१/८) मते मिळणे बंधनकारक आहे. जर उमेदवाराला तेवढी मते मिळाली नाहीत तर त्यांनी उमेदवारी अर्जाबरोबर भरलेली अनामत रक्कम सरकार जमा होते. याच नियमाला अनुसरून रत्नागिरी पालिकेच्या निवडणुकीत ३० उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. दोन हजार ते एक हजार अशी अनामत रक्कम घेण्यात आली होती. यामध्ये नगराध्यक्ष पदाच्या सहा उमेदवारापैकी प्राजका किणे, साना कोसुंबकर, वाहिदा मुर्दशा, अॅड. सुस्मिता शिंदे यांची ४ हजार अनामत जप्त झाली आहे.
नगरसेवकपदासाठी रिंगणात असलेल्या प्रभाग १. मध्ये रुक्साना प्रभुलकर, (मोज झारी, मिलिंद साळवी, प्रभाग २ सोनाली केसरकर, योगेश हळदवणेकर, प्रभाग ३ मध्य भास्कर आंबेकर, प्रभाग ४ सायमा काशी, नाफिला मजयावकर, इम्रान नेवरेकर, राहिल मुकादम, प्रभाग ८ मध्ये स्नेहा ठीक, शाहीद यस्ता, प्रभाग ९ श्रृष्टी आडमकर, संध्या कोसुमकर, अॅड, तमना झारी, प्रभाग १९ तुषार कांबळे, प्रभाग १२ सचिन तळेकर, प्रभाग १३ फरझाना मस्तान, प्रसाद भुते, फैयाज मस्तान, इरफान होडेकर, प्रभाग १४ प्रकाश कीर, प्रभाग १५ राकेश आंबे, प्रभाग १६ रेहाना वस्ता, नाज़ौर मुल्ला, खलील वस्ता यांच्या समावेश आहे. यांची ४१ हजार एवढी अनामत रक्कम जप्त झाली आहे.

