25.6 C
Ratnagiri
Saturday, December 7, 2024

रहाटाघर बसस्थानकातही आता मोकाट गुरे…

शहरातील मोकाट गुरांच्या प्रश्नाकडे सर्वच यंत्रणांनी डोळेझाक...

नव्या सरकारचा शपथविधी होताच रत्नागिरीत भाजपाचा जल्लोष

राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री...

राजापूर पोस्ट कार्यालयातील पीआरएस सुविधेवर लगेच वक्रदृष्टीः सेवा बंद होणार

जिल्हयातील रत्नागिरीसह लांजा, संगमेश्वर आणि राजापूर येथील...
HomeMaharashtraनिवडणुकीचा एसटी प्रवाशांना फटका

निवडणुकीचा एसटी प्रवाशांना फटका

ग्रामीण भागासह लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या रद्द झाल्या आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी आज महाराष्ट्रात मतदान पार पडत आहे.आज नेहमीप्रमाणे प्रवासी पनवेल एसटी डेपोत आले. मात्र, गाड्यांची संख्या अत्यंत कमी असल्याने प्रवाशांची दिवसभर अफाट गर्दी झाली होती. अखेर प्रवासी रस्ता करत खासगी वाहने, रिक्षा, शेअर रिक्षा करून प्रवासी बाहेर पडत होते. विधानसभा निवडणुकीसाठी एसटी बस निवडणूक आयोगाच्या सेवेत गेल्याने प्रवाशांना त्याचा असा फटका बसला. त्यामुळे प्रवाशांचा राग वारंवार अनावर होताना दिसत होता. मतदान करून कामावर जाणारे तसेच मतदानासाठी पेण, अलिबाग, महाड, पोलादपूर, मुरुड, माणगाव तसेच कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचे पनवेल एसटी डेपोत बुधवारी प्रचंड हाल झाले. ७० टक्के एसटी बस निवडणुकीच्या कामासाठी गेल्याने प्रवाशांना याचे मोठे हाल सहन करावे लागले. गाड्या अत्यल्प आणि वाढते प्रवासी यामुळे दिवसभर डेपोत प्रवाशांची गर्दी दिसत होती.

शिवाय एखादी गाडी आली की त्यात शिरण्यासाठी प्रवाशांची तडफड होत होती. त्यातच त्यात मुंबईसह ठाणे, बोरिवली आदी ठिकाणांहून येणाऱ्या एसटी भरून येत असल्याने पनवेल डेपोतील प्रवाशांना गाडीत प्रवेश मिळणे खूपच कठीण जात होते. प्रवाशांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागला. अशातच अनेक प्रवाशांनी एसटीच्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांचे लक्ष वेधले. मात्र, विधानसभा ड्युटीवर गाड्या गेल्याने प्रवासांनी संयम राखावे, असे आवाहन ते करत होते. मात्र, दिवसभर अशीच परिस्थिती होती. त्यामुळे प्रवाशांना जास्त पैसे खर्च करून खासगी गाड्यांनी प्रवास करावा लागला. यात ज्येष्ठ नागरिक, महिलांचे खूप हाल झाले. जवळपास रायगड जिल्ह्यातील सर्व एसटी डेपोंमधील परिस्थिती पनवेल प्रमाणेच होती.

लालपरीलाही निवडणुकीची सुट्टी नाही ;प्रवाशांचे हाल – आज कुठेही एसटीने जाण्याचा बेत करत असाल तर एसटीच्या भरवशावर घराबाहेर पडू नका. मंगळवारी दुपारपासूनच सोलापूर जिल्ह्यातील ५९६ पैकी ४६८ बस या निवडणूक कामासाठी गुंतलेल्या आहेत. यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहेत. मतदानासाठी अनेकजणांचा मूळ गावी जाण्याचा बेत असेल तर त्यामध्ये बदल करावा लागणार आहे. कारण मंगळवारी दुपारपूर्वीच जिल्ह्यातील ४६८ बस गाड्या निवडणूक कामात गुंतल्या आहेत. मंगळवारीच ग्रामीण भागासह लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या रद्द झाल्या आहेत. सोमवारी मुक्कामी गेलेल्या अनेक गाड्या परत येताच थेट डेपोत थांबल्या. त्यानंतर दुपारी जिल्ह्यातील विविध मतदार केंद्रावर या बस रवाना झाल्या. मतदानासाठी अनेकजणांचा मूळ गावी जाण्याचा बेत असेल तर त्यामध्ये बदल करावा लागणार आहे. कारण मंगळवारी दुपारपूर्वीच जिल्ह्यातील ४६८ बस गाड्या निवडणूक कामात गुंतल्या आहेत. मंगळवारीच ग्रामीण भागासह लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या रद्द झाल्या आहेत. सोमवारी मुक्कामी गेलेल्या अनेक गाड्या परत येताच थेट डेपोत थांबल्या. त्यानंतर दुपारी जिल्ह्यातील विविध मतदार केंद्रावर या बस रवाना झाल्या.

RELATED ARTICLES

Most Popular