21.1 C
Ratnagiri
Saturday, February 24, 2024

सुक्या काजू बियांचे दरही गडगडले,वातावरणाचा परिणाम

प्रतिकूल आणि ढगाळ हवामान, सकाळच्या सत्रामध्ये दाट...

काजरघाटी-धारेवर ब्राऊन शुगर विकणाऱ्याला अटक

शहरालगतच्या वर्दळीचे ठिकाण असलेल्या काजरघाटी- धारेवर ब्राऊन...
HomeRatnagiriश्रमदानातून बंधारे उभारल्याने एक कोटीची बचत - पाणी जिरवा मोहीम

श्रमदानातून बंधारे उभारल्याने एक कोटीची बचत – पाणी जिरवा मोहीम

यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने पाणीटंचाईची तीव्रता अधिक जाणवण्याची शक्यता आहे.

पाण्याची बचत व साठवण केल्यास त्याचे उन्हाळ्यात मिळणारे फायदे लक्षात घेऊन पाणी अडवण्यासाठी जिल्हा परिषदेने कच्चे बंधारे उभारण्यासाठी प्रत्येक गाव, वाडीमध्ये सूचना दिल्या आहेत. यंदा आठ हजार बंधाऱ्यांचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत २२०० बंधारे बांधले असून, श्रमदानामुळे सुमारे १ कोटी १० लाखांची बचत झाली आहे, तसेच उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या पाणीटंचाईची होणार आहे. तीव्रताही कमी प्रमाणापेक्षा जास्त पाऊस पडूनही जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई उद्भवते. कारण, येथील जमीन जांभ्या दगडाची असल्याने पावसाचे पाणी जमिनीवाटे नदी, नाले, समुद्राला जाऊन मिळते. या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात येतात.

यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने पाणीटंचाईची तीव्रता अधिक जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे आतापासूनच पाणीबचतीचे नियोजन करण्यात येत आहे.  उन्हाळ्यामध्ये उद्भवणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आतापासूनच प्रशासन तयारीला लागले आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेने पाणीटंचाईला सामोरे जाण्यासाठी ‘मिशन बंधारे’ ही मोहीम हाती घेतली आहे. त्यामध्ये वनराई, कच्चे आणि विजय बंधारे उभारण्यात येत आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतीला १० बंधारे उभारण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ग्रामसेवक आणि कृषी विभागाचे अधिकारी ग्रामस्थ, सामाजिक संस्थांना बरोबर घेऊन श्रमदानाने बंधारे उभारले जात आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत २२०० बंधारे उभारून पाणी अडवण्यात आले आहेत. त्यामध्ये १० लाख कोटी लिटर पाणी साठणार आहे. हे बंधारे लोकसहभागातून केले जात असल्यामुळे शासनाचे १ कोटी १० लाख रुपयांची बचत झाली आहे. बंधाऱ्यासाठी लागणाऱ्या पिशव्यांचा खर्च येतो. बंधाऱ्यासाठी श्रमदान केल्यामुळे मजुरीचा प्रश्न उद्भवत नाही. मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनीही स्वतः श्रमदान करत ग्रामस्थांना आवाहन केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular