33.2 C
Ratnagiri
Thursday, February 29, 2024

कातकरी कुटुंबीयांसाठी ‘शासन आपल्या दारी’

चिपळूण तालुक्यात वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या; परंतु अधिकृत...

चिपळुणातील वृद्ध महिलेच्या खुनाला वाचा फुटली

वालोपे येथे झालेल्या वृद्ध महिलेच्या खुनाला अखेर...

किरण सामंतांनी घेतले ना. नारायण राणेंचे आशीर्वाद…

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे जेष्ठ नेते...
HomeKhedपक्षाच्या कोकणातील नेत्यांना संपवण्याचा विडा - रामदास कदम

पक्षाच्या कोकणातील नेत्यांना संपवण्याचा विडा – रामदास कदम

शिवसेना शाखा हे शिवसैनिकांचे मंदिर आहे.

कोकणातील पक्षाच्या नेत्यांना संपवण्याचा विडा उद्धव ठाकरे यांनी उचलला होता. ज्या शिवसैनिकांनी संघटनेसाठी खटले अंगावर घेऊन पक्षाचा पाया रचला त्यांना धुळीस मिळवण्याचा प्रयत्न ठाकरे यांनी केला; मात्र शिवसेनाप्रमुखांनी दिलेल्या बाळकडूमुळे आम्ही हे कारस्थान हाणून पाडले, असा घणाघात शिवसेना नेते रामदास कदम यांनी केला. तालुक्यातील भरणे येथे शिवसेना नेते रामदास कदम व आमदार योगेश कदम यांच्या हस्ते शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. नवीन कार्यालयासाठी नवीन स्त्रणवाहिका उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना आमदार योगेश कदम यांना केली. भास्कर जाधव यांचा आगामी विधानसभा निवडणुकीत गुहागर मतदारसंघात मोठ्या मताधिक्याने पराभव करू.

दापोली मतदारसंघातून निवडून येताना आमदार योगेश कदम राज्यातील २८८ मतदारसंघांतील सर्वात जास्त मताधिक्य घेतील, असा विश्वास रामदास कदम यांनी व्यक्त केला. शिवसेना शाखा हे शिवसैनिकांचे मंदिर आहे. त्याचा वापर ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या सूत्रानुसार होईल, असेही त्यांनी सांगितले. शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, तालुकाप्रमुख सचिन धाडवे, सचिव महेंद्र भोसले, सिकंदर जस्नाईक, अरुण कदम, रामचंद्र आईनकर, शांताराम चिनकटे, कुंदन सातपुते, शैलेश कदम आदी उपस्थित होते. तालुक्यातील बोरघर, शेल्डी, काडवली पाजवेवाडी आणि असगणी येथील विविध पक्षांच्या कार्यकत्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

RELATED ARTICLES

Most Popular