26.1 C
Ratnagiri
Tuesday, September 17, 2024
HomeRatnagiriसिव्हीलमध्ये 'टमकावून' आलेल्या कर्मचाऱ्याला डीन नी रंगेहात पकडले!

सिव्हीलमध्ये ‘टमकावून’ आलेल्या कर्मचाऱ्याला डीन नी रंगेहात पकडले!

अपघात विभागासमोर आपली आलिशान गाडी लावली व गाडीच्या बॉनेटवर खुलेआम 'खंबा' ठेवला.

रत्नागिरीतील सिव्हील हॉस्पिटलला झाले आहे तरी काय? अशी चर्चा आता जनतेत सर्वत्र सुरु झाली आहे.

तोंडाला उग्र दर्प ! – रत्नागिरीतील मेडीकल कॉलेजचे डीन हेच रत्नागिरीच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये प्रमुख कारभारी असल्याचे सांगण्यात येते. रिवाजानुसार ते शनि. दि. २४ ऑगस्ट २०२४ रोजी वॉर्डात फिरुन पेशंटची चौकशी करत असता सिव्हीलचा एक कर्मचारी त्यांच्या समोर आला.. त्याच्या तोंडाला येणारा उग्र दर्प डीन महोदयांच्या नाकात शिरला आणि जे काय समजायचे ते समजून चुकले.

हलत-डुलत होता! – उग्र दर्प नाकात शिरल्याने डीन महोदयांनी त्यांच्याकडे जातीने लक्ष दिले तेव्हा तो ‘गडी’ हलत डुलत असल्याचे त्यांच्या ध्यानी आले. त्यांनी त्वरीत त्याला तंबी दिली व असे प्रकार यापुढे होता कामा नयेत असे बजावले. परंतु ‘गडी’ मुरब्बी होता.. असल्या तंबीला भीक घालण्याचा बहुदा त्याचा स्वभाव नसावा.

टमकावून आला ! – एवढे झाल्यानंतर तो बाहेर गेला आणि ‘ते’ डॉक्टर जसे करत तसेच त्याने केले.. त्यांच्या प्रमाणेच हा ‘गडी’ देखील बाहेर गेला आणि येताना जोरदारपणे ‘ढोसून’ म्हणजेच ‘टमकावून’ आला.. आल्यावर त्याच्या तोंडाचा दर्प अधिकच येवू लागला.. डीन साहेबांच्या हे लक्षात आले. त्यांनी त्याच्यावर रितसर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आणि प्रकरण पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाले.

‘त्या’ डॉक्टरांचा पराक्रम ! गाडीच्या बॉनेटवर ‘खबा’ – जे डॉक्टर बाहेर जावून ‘टम कावून’ येत त्यांच्याबाबत घडलेल्या अनेक बाबी आता जनतेत खुलेआम चर्चिल्या जावू लागल्या आहेत. ते डॉक्टर विलक्षण ‘बिनधास्त’ होते. तेथील कर्मचारीच आता सारे सांगू लागले आहेत. एकदा त्या डॉक्टरनी अपघात विभागासमोर आपली आलिशान गाडी लावली व गाडीच्या बॉनेटवर खुलेआम ‘खंबा’ ठेवला व शेखी मिरवली

लॉकरमध्ये खंबे व कंडोम – दरम्यान डीन महोदयांनी त्या कर्मचाऱ्याच्या लॉकरची झडती घेण्याचा निर्णय घेतला. लॉकर उघडण्यात आला तर त्यामध्ये कोणत्या तरी ब्रँडच्या ‘काढ्या’चे म्हणे ‘खंबे’ सापडले. एवढेच नव्हे तर त्यामध्ये कंडोम देखील सापडले. हे सर्व पाहून उपस्थित मंडळी थक्क झाली. सिव्हीलमध्ये काय काय चालू आहे याचा सज्जड पुरावा त्यांना प्रत्यक्ष पहावयास मिळाला.

सारे अद्याप सुरुच ! – हिंदीत अशी एक ‘कहाँवत’ म्हणजेच ‘म्हण’ आहे की, “जग जुम्मत, न जुम्मत गुलमहंमद” म्हणजेच ‘जग सुधारले तरी गुलमहंमद सुधारला नाही’. रत्नागिरीच्या भाषेत सांगायचे तर “रत्नागिरीची गटारे सुधारतील परंतु पुढारी सुधारायचे नाहीत”.. तसाच काहीसा रत्नागिरी सिव्हील हॉस्पिटलचा प्रकार आहे.. तेथील एका डॉक्टरने जे काही केले त्याचे व्हिडीओ व्हायरल झाले, बातम्या झळकल्या, त्याच्यावर पोलिस केस दाखल झाली आणि आता निलंबनाची कारवाई सुरु झाल्याचे सांगण्यात येते, तरीही हे प्रकार सुरुच आहेत !

डॉक्टरचा आदर्श! – पाठोपाठ सिव्हीलमध्ये खुद्द डीनच्या निदर्शनास ही बाब आली आणि आजवर सारी जनता जी ठणाठणा बोंब मारत आहे ती वस्तुस्थिती आहे याचा पडताळा त्यांना पहावयास मिळाला. सिव्हीलमध्ये जे डॉक्टरनी केले त्याचा आदर्श या मंडळींनी घेतला की काय अशी शंका आता जनतेत खुलेआम चर्चिली जावू लागली आहे.

ट्रीटमेंटचा पंचनामा! – सिव्हीलमध्ये मोठ्या प्रमाणावर गोरगरीब पेशंट जात असतात. ज्यांना बड्या हॉस्पिटलचे खर्च परवडत नाहीत अशी गोरगरीब जनता उपचारासाठी सिव्हीलमध्ये जाते. या गोरगरीबांना सिव्हीलमध्ये अशी काही ‘ट्रीटमेंट’ मिळते की त्याचा सविस्तर पंचनामा करणे अत्यावश्यक असल्याचे अनेक नागरिकांनी सांगितले.

नागरिक संतप्त – अशा स्थितीत सिव्हीलं मधील डॉक्टर व कुणी कुणी कर्मचारी अशा प्रकारे ‘टमकावून’ जर का ड्युटीवर येत असतील तर मग गोरगरीब जनतेला वाली कोण? असा प्रश्न निर्माण होतो. गरीब जनतेला सिव्हीलमध्ये अनंत गैरसोयी आणि प्रसंगी पराकोटीचा उन्मत्तपणा सोसावा लागतो. आधीच व्याधींनी त्रस्त असलेल्या गरीबांना हे सर्व सोसावे लागते याबद्दल अनेक सुजाण नागरिकांनी सडेतोडपणे संताप व्यक्त केला.

गरीबांना वाली कोण? – गोरगरीब प्रजेला जर हे सर्व भोगावे लागत असेल तर मग गरीबांना वाली कोण? असा प्रश्न आता संतप्त जनता विचारु लागली आहे. दुर्दैव म्हणजे याला ज्यांनी कठोरपणे आळा घालावयाचा तेच त्यावर ‘पांघरुण’ घालू लागले तर मग गरीबांना कुणीच वाली नाही अशी संतप्त भावना जनतेत आता व्यक्त केली जावू लागली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular