25.6 C
Ratnagiri
Monday, September 16, 2024
HomeRatnagiriविरोधकांच्या आरोपाने विकासाकामांनी उत्तर दिले म्हणूनच जनतेचे प्रेम मिळाले : नाम. उदय सामंत

विरोधकांच्या आरोपाने विकासाकामांनी उत्तर दिले म्हणूनच जनतेचे प्रेम मिळाले : नाम. उदय सामंत

शिक्षणाचे केंद्रस्थान व्हावे यासाठी मंत्री उदय सामंत यांनी जोर दिल्याचे दिसत आहे.

अनेकदा विरोधकांनी आपल्या विरोधात रान उठविण्याचा प्रयत्न केला, प्रत्येकवेळी मी विकासकामाने उत्तर दिले. पहिल्या अडीच वर्षात मनास ारखे काम करता आले नाही. मात्र त्यानंतर गेल्या दोन वर्षात शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात समाधानकारक काम केल्याचा आनंद आहे, असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी उदय पर्व या कार्यअहवालाच्या प्रकाशनप्रसंगी बोलताना केले. यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनीही ना. सामंत यांच्या कामाचे कौतुक केले. रत्नागिरीत विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे, स्थानिक पातळीवर रत्नागिरी हे शिक्षणाचे केंद्रस्थान व्हावे यासाठी मंत्री उदय सामंत यांनी जोर दिल्याचे दिसत आहे.

यामुळे आता ज्ञानेश्वर हवेतच पण विज्ञानेश्वर देखील विद्यार्थ्यानी बनले पाहिजे असा मोलाचा सल्ला ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी दिला आहे. राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या कार्यअहवाल ‘उदयपर्व’च्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यभरासह रत्नागिरीत सुरु असलेल्या उपक्रम व कार्याचे त्यांनी भरभरुन कौतूक केले. रत्नागिरीतील स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी ज्येष्ठ समाज-सेवक डॉ. विकास आमटे, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर व मान्यवर उपस्थित होते.

रत्नागिरी हे खरोखरच कॅलिफोर्नियाहूनही सुंदर असून, येथे निसर्गतः श्रीमतीं आहेच पण अध्यात्मि क, मनांची व सांस्कृतिक श्रीमंती येथे पहावयाचे मिळते. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासारखे नेतृत्व येथे आहे. विचारातूनच नाही तर कृतीतून त्यांचे नेतृत्व व्यक्त होत असल्याचे डॉ. माशेलकर यावेळी म्हणाले. यावेळी प्रास्ताविक करताना उद्योगमंत्री सामंत म्हणाले की, पहिल्या अडीच वर्षात मनासारख्या गोष्टी घडल्या नाहीत. परंतु समोर ठेवलेले लक्ष्य साध्य करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला.

वैद्यकीय महाविद्यालय, इंजिनिअरींग कॉलेजचे स्वप्न पूर्ण झाले. ज्या ठिकाणी जमीन मागितली, त्याठिकाणी येथील लोकांनी विश्वास ठेवून जागा दिली. कामे करताना अनेकदा चुकाही होतात. मोठा पाऊस पडल्याने रस्त्याला खड्डे पडले. विरोधकांनी आपल्या विरोधात रान उठवले, परंतु मी मान्य केले ते खड्डे माझ्यामुळेच पडले. मी सातत्याने पारदर्शकपणे कामे करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगतानाच महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर घसरतो आहे. पण मी कुणाची बदनामी करणार नाही कारण रत्नागिरी हे सांस्कृतिक अध्यात्मिक वारसा असलेले शहर असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी व्यासपिठावर रत्नागिरीतील ज्येष्ठ उद्योजक दीपक गद्रे, माजी कुलगुरु डॉ. श्रीरंग कद्रेकर, श्रीदेव भैरीबुवा देवस्थानचे अध्यक्ष मुन्ना सुर्वे, ज्येष्ठ उद्योजक रविंद्र सामंत आदींसह रत्नागिरी मतदार संघातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी नाम फाऊंडेशन व जलसंधारण विभागामध्ये १५ नद्यांचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यासंदर्भात एमओयू करण्यात आला. त्याचप्रमाणे एम आयडीसीतील दहा भूखंड विविध सामाजिक संस्थांना देण्यात आले. यासाठी अभिनेते नाना पाटेकर यांनी चिठ्या काढून संस्थांना भूखंडांचे वाटप करण्यात आले.

RELATED ARTICLES

Most Popular