26.8 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriरिकामा ऑक्सिजन सिलेंडर जोडल्याने, रुग्ण अत्यवस्थ

रिकामा ऑक्सिजन सिलेंडर जोडल्याने, रुग्ण अत्यवस्थ

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आरोग्य यंत्रणेच्या चाललेल्या कारभाराबद्दल वानवाच असल्याची अनेक उदाहरणे दिसून येत आहेत. चिपळूण तालुक्यातील कामथे रुग्णालयामध्ये घडलेली घटना काळजाचा ठोका चुकवणारी आहे. कोरोना काळामध्ये कामथे रुग्णालयामध्ये रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा करणारा रिकामा सिलेंडर लावला गेल्याने, ३० ते ३५ रुग्णांच्या जिवाला धोका निर्माण झाला होता, मात्र प्रसंगावधान राखल्याने आणि पर्यायी व्यवस्था त्वरीत उपलब्ध केल्याने बाका प्रसंग टळला.

चिपळूणच्या कामथे उपजिल्हा रुग्णालयाला देणगी स्वरूपात ४ ड्युरा सिलेंडर मिळाली आहेत. एक ड्युरा सिलेंडर सहा तास ऑक्सिजन पुरवतो, एक संपला कि एक सिलेंडर भरून आणला जातो,  रुग्णांना ऑक्सिजन देण्यासाठी काल असाच एक नवीन सिलेंडर जोडण्यात आला,  परंतु, काही काळाने एका पाठोपाठ एक असे रुग्ण अस्वस्थ झाल्याने, हॉस्पिटलमध्ये गोंधळ उडाला आणि सर्वच रुग्ण असे का करायला लागले हे कळेनासे झाले, नंतर लावलेला सिलेंडर हा रिकामा असल्याचं समजताच, उपलब्ध असलेले ऑक्सीजन भरलेले सिलेंडर त्वरित रुग्णांना लावला गेला.

सदरचा ड्युरा सिलिंडर लोटे एमआयडीसी येथील क्रायो गॅस एजन्सीने हा सिलेंडर पाठविण्यात आला असल्याचे निष्पन्न झाले. हॉस्पिटलमध्ये दहा जम्बो सिलेंडर ज्यादा स्टॉक मध्ये उपलब्ध असल्यामुळे मोठा अनर्थ टाळला, अन्यथा वितरकाने पाठवलेल्या रिकाम्या सिलेंडरमुळे आज अनेक रुग्णांचा जीवावर बेतलं असते.

या घटनेची वार्ता हा हा म्हणता, सर्वत्र पसरल्याने माहिती घेण्यासाठी अनेक जणांनी रुग्णालयामध्ये धाव घेतली. सामाजिक कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक रामशेठ रेडीज, सिद्धेश लाड, संदेश मोहिते आदि हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आणि त्यानी संबंधित प्रकाराची गंभीर दखल घेतली. रुग्णालयाचे डॉक्टर सानप यांनी सदर क्रायो गॅस एजन्सीला नोटीस दिल्याचे सांगण्यात आले, पण तरीही रुग्णालयाच्या कारभारावर सुद्धा प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित एजन्सीवर कारवाई करण्यात यावी अशी जनतेतून मागणी केली जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular