27.3 C
Ratnagiri
Saturday, August 30, 2025

शिंदेंच्या मंत्र्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी…

राज्यात महायुती असली तरीही भाजपकडून कुरघोडींचे राजकारण...

पेढांबेतील पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत, अवजड वाहतूक बंद

दुरुस्तीअभावी धोकादायक झालेला पेढांबे येथील जुन्या पुलावरून...

जनआरोग्य योजनेतील कार्ड बनवा : एम. देवेंदर सिंह

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा...
HomeRatnagiriरत्नदुर्गाच्या बुरूज परिसरात अतिक्रमण…

रत्नदुर्गाच्या बुरूज परिसरात अतिक्रमण…

टेहळणी बुरुजाच्या आजूबाजूला अनधिकृत बांधकामाचा विळखा पडला आहे.

रत्नागिरीतील प्रसिद्ध रत्नदुर्ग किल्ल्याचा टेहळणी बुरूज पेठकिल्ला येथील समुद्रात आहे. या बुरुजाच्या अवतीभवती झालेल्या अनधिकृत बांधकामाविरुद्ध समस्येच्या गर्तेत अडकला आहे. स्थानिक रहिवाशांनी याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. हे अनधिकृत बांधकाम काढून टाकण्यासाठी सुमारे चारशे ते पाचशे स्वाक्षऱ्या असलेले निवेदन ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांसह बंदर विभाग, परिषदेकडे तक्रारी केल्या आहेत. ऐतिहासिक ठेव्याला बाधा निर्माण करण्याचे काम काहींनी केले आहे. बुरूज ढासळला असून, त्याची दुरवस्था झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात समुद्रातून जहाजाद्वारे होणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी हा रत्नदुर्ग किल्ल्यावर हा टेहळणी बुरूज बांधण्यात आला होता. समुद्रमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी समुद्रातच टेहळणी बुरूज बांधण्यात आला होता.

या बुरुजाच्या आजूबाजूला अनधिकृत बांधकामाचा विळखा पडला आहे. यासंदर्भात स्थानिक ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत तक्रारी केल्या आहेत; परंतु यावर अजूनही कोणतीही कार्यवाही झाली नाही. अनधिकृत बांधकामांचे प्रमाण वाढतच गेल्याने पुन्हा एकदा स्थानिक ग्रामस्थांनी तक्रारी केल्या आहेत. अनधिकृत बांधकामांमुळे शिवकालीन ठेवा असणाऱ्या पावित्र्यास धोका पोहतच आहे. बुरुजावर येण्या-जाण्यासाठी असलेल्या शिवकालीन मार्गासह आजूबाजूला झालेले अतिक्रमण तातडीने हटवण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

वास्तूच्या सौंदर्य, पावित्र्याला बाधा – शिवकालीन वास्तूच्या सौंदर्यास व पावित्र्यास बाधा पोहोचवण्याचे काम सुरू आहे. तसेच या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था निर्माण होण्याची शक्यता आहे. गडकिल्ले यांचे जतन व संवर्धन करण्यासाठी व हा सांस्कृतिक वारसा सुस्थितीत ठेवण्यासाठी किल्ल्यावरील सर्व अनधिकृत बांधकामे तत्काळ हटवण्यात यावीत आणि पुन्हा अतिक्रमणे होऊ नयेत याची दक्षता घ्यावी, असे निवेदनात म्हटले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular