26.1 C
Ratnagiri
Tuesday, October 14, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeChiplunमहावितरणच्या खांबावर खासगी केबलचे अतिक्रमण

महावितरणच्या खांबावर खासगी केबलचे अतिक्रमण

विजेच्या खांबावर खासगी कंपन्यांना केबल टाकण्याचा अधिकार नाही.

शहरात बीएसएनएलकडून इंटरनेटची सेवा ग्राहकांना पुरवली जाते. त्याशिवाय काही खासगी कंपन्याही शहरात इंटरनेट सेवा देत आहे. यातील काही खासगी कंपन्यांनी इंटरनेटची केबल टाकण्यासाठी महावितरणच्या विद्युत खांबांचा आधार घेतला आहे. या केबल खांबावरून काढण्याच्या सूचना देण्यात आल्या. तरीही गेले चार महिने खांबावर खासगी केबल जैथे थे आहेत. सुरवातीला बीएसएनएलकडून खांब उभारण्यात आले होते. मात्र शहरात इंटरनेट सुविधा देणाऱ्या काही खासगी कंपन्यांनी महावितरणच्या विद्युत खाबांचा आधार घेतला. विजेच्या खांबावर खासगी कंपन्यांना केबल टाकण्याचा अधिकार नाही.

केवळ शासनाच्या महानेट कंपनीला खांबावरून केबल नेण्यास मान्यता दिली आहे. मात्र पायाभूत खर्च टाळून विद्युत खाबांचा आधार घेतला जात आहे. पावसाळ्यात दुरुस्तीच्यावेळी कर्मचाऱ्यांना याचा त्रास होतो. याची माहिती महावितरणला मिळाल्यानंतर कार्यकारी अभियंता कैलास लवेकर यांनी तत्काळ संबंधित केबल चालकांना सूचना देत केबल काढून टाकण्याचे आदेश  दिले होते.

RELATED ARTICLES

Most Popular