25.9 C
Ratnagiri
Monday, July 15, 2024

मुंबईला जगाची आर्थिक राजधानी बनविण्याचं माझं स्वप्नः नरेंद्र मोदी

लोकसभेच्या निवडणूक निकालानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी...

संगमेश्वरात एसटीतून चक्क छत्र्या उघडून करावा लागला प्रवास

शनिवारी संगमेश्वर ते कोंडये सोडण्यात आलेल्या एस....

मुंबईसह कोकणातही मुसळधार पावसाची बरसात…

मुंबई शहरासह उपनगरात आज सकाळपासूनच पावसाने दमदार...
HomeChiplunचिपळुणातही होणार सभा, उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांमध्ये ऊर्जा

चिपळुणातही होणार सभा, उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांमध्ये ऊर्जा

उद्धव ठाकरे हे ४ आणि ५ फेब्रुवारीला कोकण दौऱ्यावर येत आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवस कोकण दौऱ्यावर येत असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. या दौऱ्यात ठाकरे काय बोलणार, याबाबत शिवसैनिकांसह महाविकास आघाडीलाही उत्सुकता आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने शिवसैनिकांमध्ये ऊर्जा निर्माण झाली असून चिपळुणातील जाहीर सभेची जोरदार तयारी सुरू केली आहे. उद्धव ठाकरे हे ४ आणि ५ फेब्रुवारीला कोकण दौऱ्यावर येत आहेत. या दोन दिवसाच्या दौऱ्यात ते रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यात विधानसभा मतदार संघनिहाय जाहीर सभा घेत पदाधिकारी, कार्यकर्ते व जनतेशी संवाद साधणार आहे.

पहिल्या टप्प्यात रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर, रत्नागिरी व चिपळूण मतदार संघात ते ५ ला सभा घेणार आहेत. तत्पूर्वी ते ४ फेब्रुवारीला सावंतवाडी, कुडाळ, मालवण, आंगणेवाडी भराडीदेवी दर्शन, कणकवली असा दौरा करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरे हे ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्या निवासस्थानी पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत. त्यानंतर ५ ला उद्धव ठाकरे बारसू, राजापूर, रत्नागिरी, देवरूख, चिपळूण या ठिकाणचा दौरा करणार आहेत. या निमित्त रिफायनरीविरोधी आंदोलनामुळे चर्चेत आलेल्या बारसू या गावालाही भेट देणार आहेत. त्यानंतर रत्नागिरी येथील सभा झाल्यानंतर चिपळुणात सायंकाळी ४ वाजता जाहीर सभा होणार आहे.

या आधी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी कोकण दौरा केला होता. त्यानंतरही ठाकरे गटाच्या नेत्यांचे कोकण दौरे सुरूच आहेत; मात्र आता थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर येत असल्याने पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील उमेदवारीवरून इच्छुकांमध्ये मोठी चढाओढ सुरू आहे. लोकसभेसाठी महाविकास आघाडीचा कोण असणार यावरूनही खलबते सुरू आहेत. त्यामुळे याबाबत उद्धव ठाकरे काय बोलतात, याकडेही लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular