28.4 C
Ratnagiri
Monday, March 24, 2025

मुंबईसमोर चेन्नईचे फिरकीचे जाळे ? सलामीलाच आमनेसामने

सर्वाधिक आणि प्रत्येकी पाच वेळा आयपीएल जिंकणारे...

घरपट्टी थकवणाऱ्या ६४ मालमत्ता सील रत्नागिरी पालिकेची कारवाई

घरपट्टी वसुलीच्या दृष्टीने रत्नागिरी पालिका अॅक्शन मोडवर...

कोकणात लवकरच ‘मालवणी भाषा भवन’ उभारणार : ना. नितेश राणे

कोकण साहित्यिकांची भूमी आहे. अनेक साहित्यिक या...
HomeSportsइंग्लंडची मजल १७१ धावांपर्यंत वरुण चक्रवर्तीच्या ५ विकेट, शमीचे पुनरागमन

इंग्लंडची मजल १७१ धावांपर्यंत वरुण चक्रवर्तीच्या ५ विकेट, शमीचे पुनरागमन

हा सामना मोहम्मद शमीच्या पुनरागमनासाठीही वैशिष्ट्यपूर्ण ठरला.

फलंदाज बाद होत असले तरी आक्रमण कायम ठेवायचे या विचाराने फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडने भारताविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात २० षटकांत नऊ बाद १७१ धावांपर्यंत मजल मारली. भारताचा हुकमी मिस्ट्री गोलंदाज वरुण चक्रवर्तीने पाच विकेट मिळवण्याची कामगिरी केली. एक वेळ तो हॅट्ट्रिकवर होता. आजचा हा सामना मोहम्मद शमीच्या पुनरागमनासाठीही वैशिष्ट्यपूर्ण ठरला. त्याला एकही विकेट मिळाली नाही, तीन षटकांत त्याने २५ धावा दिल्या. सलग तिसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडकडून आज बेन डकेट आणि लिएम लिव्हिंगस्टन यांनी भारतीय गोलंदाजांचा समाचार घेतला. वॉशिंग्टन सुंदर आणि रवी बिश्नोई फार महागडे ठरले. सुंदरला तर एका षटकानंतर पुन्हा गोलंदाजी देण्यात आली नाही.

शमीला खेळवण्यासाठी आज अर्शदीप सिंगला विश्रांती देण्यात आली. त्यामुळे फिल साल्टला लवकर बाद करण्याची जबाबदारी हार्दिक पंड्याने पार पाडली, मात्र आज बेन डकेटची बॅट तळपली. त्याने २८ चेंडूंत सात चौकार, दोन षटकारांसह ५१ धावा फटकावल्या. त्याने बटलरसह दुसऱ्या विकेटसाठी ७६ धावांची भागीदारी केली. त्यामुळे इंग्लंडने पहिल्य १० षटकांत ८७ धावापर्यंत मजल मारली. डकेट आणि बटलर यांनी हार्दिकच्या एका षटकात १३, तर वॉशिंग्टन सुंदरच्या एका षटकात १५ धावा फटकावल्या होत्या. वरुण चक्रवर्तीचे आक्रमण सुरू झाले आणि त्याच्या न समजल्या जाणाऱ्या गुगलीवर इंग्लिश फलंदाज चकत होते. जेमी स्मिथ आणि जेमी ओव्हर्टन सलग दोन चेंडूवर बाद झाले. त्याअगोदर बिश्नोईने हॅरी ब्रुकला बाद केले होते. त्यामुळे इंग्लंडची सहा बाद ११५ अशी अवस्था झाली होती.

इंग्लंडचा डाव मर्यादित ठेवण्याची संधी असताना बिश्नोईच्या एका षटकात लिव्हिंगस्टनने तीन षटकार मारले. त्यामुळे इंग्लंडला दीडशेच्या पलीकडे मजल मारता आली. आदील रशीद आणि मार्क वूड या तळाच्या फलंदाजांनीही प्रत्येकी १० धावांचे योगदान दिले.

संक्षिप्त धावफलक – इंग्लंड : २० षटकांत ९ बाद १७१ (बेन डकेट ५१ – २८ चेंडू, ७ चौकार, २ षटकार, जॉस बटलर २४-२२ चेंडू, १ चौकार, १ षटकार, लिएम लिव्हिंगस्टन ४३ २४ चेंडू, १ चौकार, ५ षटकार, आदील रशीद नाबाद १०, मार्क वूड नाबाद १०, हार्दिक पंड्या ४-०-३३-२, वरुण चक्रवर्ती ४-०-२४-५, रवी बिश्नोई ४-०-४६-१, अक्षर पटेल ३-०-१९-१).

RELATED ARTICLES

Most Popular