रत्नागिरीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला खिंडार पडले असून माजी तालुकाप्रमुख प्रदीप उर्फ बंड्याशेठ साळवी यांच्या नेतृत्वाखाली जवळपास ४५० पेक्षा अधिक कार्यकर्त्यांनी पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यामध्ये उपतालुकाप्रमुख अभय खेडेकर, महेंद्र झापडेकर आदींसह अनेक शाखाप्रमुख, विभागप्रमुख, सरपंच, उपसरपंच आणि लोकप्रतिनिधीसह समावेश आहे. शिवसैनिकांचा विधानसभा निवडणुकीत महायुतीला हायुतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर पक्षसंघटन बळकट ठेवून करण्याकडे शिवसेनेने लक्ष केंद्रीत केले आहे. राज्यभरात ‘ऑपरेशन टायगर’ला सुरुवात झाली आहे. या ऑपरेशनची सुरुवात पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या रत्नागिरी विधानसभा म तदारसंघातून सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या गडाला सुरूंग लावत पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी मोठा धक्का दिला आहे.
जंगी शक्तीप्रदर्शन – या पक्षप्रवेश सोहळ्याच्या माध्यमातून शुक्रवारी रत्नगिरीत शिवसेनेच्यावतीने जंगी शक्तीप्रदर्शन करण्यात आले. उबाठाचे माजी तालुकाप्रमुख आणि रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष बंड्याशेठ साळवी, अभय खेडेकर, महेंद्र झापडेकर, दत्ता तांबे, आप्पा घाणेकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच ‘शिवसेना जिंदाबाद’च्या घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला.
अनेकांचा प्रक्षप्रवेश – रत्नागिरीतील हॉटेल विवेकच्या मराठा मैदानावर उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांच्या उपस्थितीत भव्य पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी आ. किरण सामंत, जिल्हाप्रमुख राहुल पंडित, शहरप्रमुख बिपीन बंदरकर, ज्येष्ठ नगरसेवक राजन शेट्ये, विजय खेडेकर, वैभवी खेडकर, स्मितल पावसकर, शिल्पा सुर्वे, निमेष नायर यांच्यासह विधानसभा मतदारसंघातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मालगुंड, करबुडे, गोळप, हरचेरी आदी भागातील उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
गड केला खाली – रत्नागिरी तालुका आणि रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ म्हणजे अखंडित शिवसेनेचा गड होता. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मदार तालुकाप्रमुख बंड्याशेठ साळवी यांच्या खांद्यावर होती. मात्र या गडाला सुरुंग लावण्यात पालकमंत्री ना. उदय सामंत यांना यश आले. साळवी यांच्या प्रवेशामुळे उद्धव ठाकरेंचा हा गड निम्म्यापेक्षा अधिक खाली झाला आहे. शेकडो कार्यकर्त्यांनी ना. उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा धनुष्यबाण पुन्हा एकदा हाती घेतला आहे. ना. उदय सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे.
आम्ही मनाने सामंतांबरोबरच ! – यावेळी आपले विचार व्यक्त करताना माजी नगराध्यक्ष बंड्याशेठ साळवी म्हणाले की, या पक्षप्रवेशामुळे आमच्यावर टीका व्हायला सुरुवात होईल. आम्ही पक्षाला फसवून प्रवेश केलेला नाही तर कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन हा प्रवेश करत आहोत. गेली अडीच वर्ष गळ्यातील धनुष्यबाणाचा दुपट्टा बाजूला गेला होता. ३० वर्ष आम्ही हा धनुष्यबाण गळ्यात घालून काम करत होतो. आम्ही मनाने उदय सामंत यांच्या सोबतच होतो, असे त्यांनी यावेळी सांगितले.
७० चे १७ हजारवर आणणार – बंड्याशेठ साळवी पुढे म्हणाले की, यावेळी विधानसभा निवडणुकीत आम्ही तिकडे म्हणजे मविआमध्ये होतोः महाआघाडीच्या उमेदवाराला ७० हजार मते मिळाली. यापुढे ७० हजाराचे मतदान आम्ही १७ हजारावर आणून ठेवू. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेचे १०० टक्के उम `दवार निवडून आणणार, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. आ. किरण सामंतांचा विश्वास या कार्यक्रमात जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांनी आतापर्यंत मी जिल्हाप्रमुख आहे, पुढे काय असेल माहित नाही, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा धागा पकडत आ. किरण सामंत यांनी जिल्हाप्रमुख पद हे बदलणार नसल्याची खात्री देत सांगितले की, तुम्ही भाग्यशाली जिल्हाप्रमुख आहात. तुमचं जिल्हाप्रमुखपद कोणीही काढणार नाही, हा शब्द मी तुम्हाला देतो, असे आ. किरण सामंत यांनी जाहीर केले आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. पक्षात प्रवेश करणाऱ्यांचे स्वागत ना. सामंत, आ. किरण सामंत आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांनी यावेळी केले.