25.6 C
Ratnagiri
Saturday, December 7, 2024

रहाटाघर बसस्थानकातही आता मोकाट गुरे…

शहरातील मोकाट गुरांच्या प्रश्नाकडे सर्वच यंत्रणांनी डोळेझाक...

नव्या सरकारचा शपथविधी होताच रत्नागिरीत भाजपाचा जल्लोष

राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री...

राजापूर पोस्ट कार्यालयातील पीआरएस सुविधेवर लगेच वक्रदृष्टीः सेवा बंद होणार

जिल्हयातील रत्नागिरीसह लांजा, संगमेश्वर आणि राजापूर येथील...
HomeRatnagiriमिऱ्या गावामध्ये उबाठाला खिंडार शेकडो युवकांचा शिवसेनेत प्रवेश

मिऱ्या गावामध्ये उबाठाला खिंडार शेकडो युवकांचा शिवसेनेत प्रवेश

या प्रवेशामुळे मिऱ्या गावात शिवसेनेची ताकद वाढली आहे.

रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील उबाठा, महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांच्या मिऱ्या गावातच शिवसेनेच्या ठाकरे गटाला खिंडार पडले असून गावातील शेकडो युवकांनी ना. उदय सामंत यांच्या कामावर विश्वास प्रकट करत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. या सर्व युवकांचे शिवसेनेत स्वतः उदय सामंत यांनी स्वागत केले. मिऱ्या गावातील अमोल विलंणकर, घाऱ्या मयेकर, दादा शिवलकर, संदिप शिरधनकर, सुरेंद्र शिरधनकर, शशांक सावंत, ग्राम पंचायत सदस्य रामदास बनप यांच्या पुढाकाराने शेकडो युवकांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला. उमेदवार आणि पालकमंत्री उदय सामंत यांनी या सर्वांचे हाती भगवा झेंडा देत स्वागत केले. माझ्या नव्या सहकाऱ्यांचे शिवसेनेत मी स्वागत करतो असे उदय सामंत म्हणाले. चुकीच्या प्रचाराला चाप यावेळी बोलताना ना. उदय सामंत म्हणाले की, मिऱ्या गावामध्ये विरोधकांकडून फेक नरेटिव्ह पसरवलं जात आहे. ज्यांनी एमआयडीसीची मागणी केली होती तेच आता उबाठामध्ये गेले आहेत. परंतू आम्ही मिऱ्या गावकऱ्यांसोबत आहोत. गावकऱ्यांच्य सहमतीनेच मिऱ्या गावचा विकास होत आहे ‘आणि भविष्यातही होत राहिल.

या प्रवेशामुळे मिऱ्या गावात शिवसेनेची ताकद वाढली आहे. यामुळे विरोधकांच्या चुकीच्या प्रचाराला उत्तर मिळाले असून मिऱ्यांच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. ग्रामपंचायत सदस्य अनिता शिरधनकर, माजी ग्रामपंचायत सदस्य अनंन्या शिवलकर, मृणाली पाटील, ग्रामपंचायत सदस्य राणी भाटकर, अजित शिवलकर, अमित सावंत, दिपीका मयेकर, अभी सावंत, सागर कदम, अक्षय सुर्वे, निलम बनप, विशाखा शिवलकर, रोहिणी सुर्वे, आराध्या सुर्वे, पायल चव्हाण, मुन्ना भाटकर, समिक्षा भाटकर यांच्यासह अनेकांनी शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला. महाविकास आघाडीचे आणि उबाठाचे उमेदवार बाळ माने यांच्या गावातच उबाठा गटाला धक्का बसल्याने शिवसेनेची ताकद वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular