24.8 C
Ratnagiri
Sunday, February 1, 2026

चिपळूणात काँग्रेससह उबाठा, राष्ट्रवादीला जोर का झटका

भाजप नेते प्रशांत यादव यांच्या नेतृत्वावर विश्वास...

मिऱ्या- नागपूर महामार्गाची ‘डेडलाईन’ हुकणार? मे अखेर काम पूर्ण होणे कठीण!

विदर्भ आणि कोकणाला जोडणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या...
HomeMaharashtraमागील काही महिन्यांपासून, वातावरणामध्ये बदल

मागील काही महिन्यांपासून, वातावरणामध्ये बदल

यंदा हिवाळ्यात थंडी ऐवजी उन्हाचे चटके देखील बसणार आहेत. कारण दिवसा उष्ण वातावरण तर, रात्री थंडीचा कडाका जाणवत आहे.

वातारणात होत असलेल्या बदलामुळे, काही ठिकाणी प्रचंड ऊन तर काही ठिकाणी थंडीचे वातावरण अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. परतीच्या पावसानंतर आत्ता गुलाबी थंडीची शाल सर्वत्र पसरत आहे. यंदा हिवाळ्यात थंडी ऐवजी उन्हाचे चटके देखील बसणार आहेत. कारण दिवसा उष्ण वातावरण तर, रात्री थंडीचा कडाका जाणवत आहे.

नोव्हेंबर महिन्यात देशात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक तापमान राहण्याचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे. सरासरीपेक्षा तापमान अधिक राहणार असल्यामुळे यंदा महाराष्ट्रात देखील गुलाबी थंडी अधिक प्रमाणात नसेल. तर उत्तर महाराष्ट्रातील काही भाग सोडता राज्यातील इतर ठिकाणी देखील सरासरीपेक्षा अधिकच किमान तापमान राहण्याची शक्यता आहे.

दर वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये ऑक्टोबर हिटचा तडाखा बसत असतो. परंतु, यंदा ऑक्टोबर महिन्यात हिट ऐवजी पावसाने धुमाकूळ घातला. महाराष्ट्रात सरासरीपेक्षा ७० टक्के अधिक पाऊस पडला आहे. सर्वाधिक मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा १०४ टक्के पाऊस पडला असून मराठवाड्यात सरासरीपेक्षा ७९ टक्के, विदर्भात सरासरीपेक्षा ५१ टक्के तर कोकणात ४५ टक्के अधिक पाऊस पडला आहे. त्यामुळे यंदा थंडी देखील जास्त कडक पडेल असा अंदाज होता.

परंतु, भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार नोव्हेंबर महिन्यात देशात सरासरी ते सरासरीपेक्षा अधित तापमान राहील. महाराष्ट्रात देखील सरासरीपेक्षा अधिक किमान तापमान राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ऑक्टोबर हिटचा अनुभव यंदा नोव्हेंबर महिन्यात येणार आहे. त्यामुळे थंडीच्या महिन्यात उन्हाने लाही लाही होणार आहे. परंतु, गुलाबी थंडी ऐवजी यंदा नोव्हेंबरमध्ये कडक उन्हाचे चटके अनुभवावे लागणार आहेत.

ऑक्टोबर महिन्यात पावसाळा संपून हिंवाळ्याला सुरुवात होण्याचा हा काळ असतो. हा बदल होत असताना जो संक्रमणाचा काळ असतो तो ऑक्टोबर महिन्यात येत असतो. या दिवसांत पाऊस थांबलेला असतो अशा वेळी आकाशातून सूर्याची किरणे सरळ धरतीला स्पर्श करत असतात. या अतिनील किरणांमुळे जी उष्णता या महिन्यात विशेष करून निर्माण होते त्या उष्णतेला ऑक्टोबर हिट संबोधले जाते.

RELATED ARTICLES

Most Popular