26.4 C
Ratnagiri
Tuesday, October 14, 2025

दहावी, बारावी बोर्ड परीक्षेसाठी राजमार्ग

कोकण व कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश...

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना नोटिसा…

आपापल्या जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्यकेंद्रांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका...

पूररेषेतील बांधकामांसाठी अटीत शिथिलता

शहरातील पूररेषेतील बांधकामांसाठी नगरविकास खात्याच्या नियमांमध्ये शिथिलता...
HomeChiplunचिपळुणात पर्यावरणपूरक दिवाळीचा आग्रह, खरेदीची लगबग

चिपळुणात पर्यावरणपूरक दिवाळीचा आग्रह, खरेदीची लगबग

शहरातील बाजारपेठा आकाशकंदील, पणत्या, सजावटीचे साहित्य, इलेक्ट्रॉनिक साहित्याने खचाखच भरल्या आहेत.

वर्षाचा सण दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. नवीन कपडे, आकाशकंदील, लाईटिंग, पणत्या, पूजेचे साहित्य अशा खरेदीची लगबग सुरू आहे. दिवाळीची धमाल सुरू होण्यापूर्वी शहरात अनेक संस्था आणि नागरिकांकडून पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यासाठी आग्रह केला जात आहे. प्लास्टिकचे साहित्य, फटाके यांना बगल देत आरोग्यदायी दिवाळी साजरी करण्यावर अनेकजण भर देत आहेत. अलीकडे दिवाळीचे स्वरूप काहीसे पालटले आहे. दिवाळी पहाटच्या कार्यक्रमांची रेलचेल, विकत आणलेला फराळ, मिठाई आणि चॉकलेट, इलेक्ट्रिकदिव्यांच्या माळा, कर्णकर्कश गाणी, फटाके यामध्ये खरी दिवाळी लोप पावत चालली आहे. शहरातील बाजारपेठा आकाशकंदील, पणत्या, सजावटीचे साहित्य, इलेक्ट्रॉनिक साहित्याने खचाखच भरल्या आहेत.

प्रत्येक दुकानासमोर गर्दी दिसत आहे. प्लास्टिकपासून बनवलेले आकाशकंदील देखील आहेत; पण कागदी, बांबू आणि खणाच्या कापडापासून बनवलेले आकाशकंदील सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. चिपळूण शहराची बाजारपेठ आजूबाजूच्या परिसरासाठी ही सर्वांत मोठी बाजारपेठ आहे. मोबाईल मार्केट, इलेक्ट्रॉनिक मार्केट, कपडा मार्केट, गृहोपयोगी वस्तूंचे मार्केट, पूजेच्या साहित्याचे मार्केट इथे आहे. त्यामुळे प्रत्येक सणाला ग्राहकांची प्रचंड गर्दी होते. गुहागर, संमेश्वर, खेड तालुक्याच्या काही भागातील लोक दिवाळी सणानिमित्त खरेदीसाठी येत आहेत. खरेदीसाठी येणाऱ्यांना काही संस्थांकडून पत्रके वाटून पर्यावरण खरेदीसाठी आग्रह धरला जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular