20.3 C
Ratnagiri
Sunday, January 25, 2026

उपनगराध्यक्ष-अभियंता यांच्यात खडाजंगी रत्नागिरी नगरपालिका

रत्नागिरी नगरपालिकेच्या आवारात आज सायंकाळी उपनगराध्यक्ष समीर...

शहरातील अतिक्रमणांवर आज हातोडा रत्नागिरी पालिका आक्रमक

शहरातील अतिक्रमणाविरोधात पालिका आक्रमक झाली आहे. यातून...

दापोलीत ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज अवैध

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरू...
HomeRatnagiriरत्नागिरीतील हाकीम खून प्रकरणातील पळालेल्या मारेकऱ्याला अखेर अटक

रत्नागिरीतील हाकीम खून प्रकरणातील पळालेल्या मारेकऱ्याला अखेर अटक

त्याच्याकडे पिस्तूल व पाच जिवंत काडतूस सापडली.

रत्नागिरीतील खून प्रकरणात जन्म ठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आणि पॅरोलवर बाहेर आल्यानंतर फरार झालेल्या कैद्याला सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेने (ग्रामीण) मंगळवेढा (अकोला) येथील शेतात अटक केली. त्याच्याकडे एक पिस्तूल व ५ जिवंत काडतूस सापडली आहेत, अशी माहिती पोलीसांनी दिली. कोल्हापूरच्या कळंबा जेलमध्ये ओळख झालेल्या निंगोडा बिराजदार या संशयिताने त्याची शेतात राहण्याची सोय केली होती. मित्राच्या भावाकडेही ३ पिस्तूल आणि २१ जीवंत काडतूस सापडली. फाईक मुस्ताक करंबेळकर (वय ४६, रा. शिवाजी नगर, रत्नागिरी)’ असे अटक करण्यात आलेल्या क़ैद्याचे नाव असल्याची माहिती पोलीसांनी पत्रकारांना दिली.

हकीम यांचा खून – रत्नागिरीतील फैयाज हकीम खून प्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. तो तुरुंगातून पॅरोलवर बाहेर आला. ४ महिन्यांपूर्वी त्याचा कालावधी संपूनही पुन्हा जेलमध्ये हजर झाला नाही. या दरम्यान कोल्हापूरच्या कळंबा जेलमध्ये ओळख झालेल्या निंगोडा बिराजदार याने फाईकची राहण्याची सोय मंगळवेढ्यातील (अकोला) शेतात केली होती. खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेप झालेला फाईक करंबेळकर याच्या ओळखीच्या निंगोडा हणुमंत बिराजदार याने फाईकला त्याच्या शेतात पत्राशेड करून राहण्याची सोय केली होती. त्याची खबर सोलापूर ग्रामीण पोलिसांना लागली आणि स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर यांच्या नेतृत्वातील पथकाने त्याला पकडण्यासाठी पहाटेच्या सुमारास सापळा लावला.

बेसावध असताना पकडले – तो सतत पिस्तूल लोड करून वावरत असल्याने पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी कोणतीही घाई केली नाही. त्याला बेसावध असतांना पकडले. त्यावेळी त्याच्याकडे पिस्तूल व पाच जिवंत काडतूस सापडली. त्यासंदर्भात विचारणा केल्याने त्याने पिस्तूल निंगोडा बिराजदार याच्याकडून घेतल्याचे सांगितले. पोलिसांनी निंगोडाला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी भाऊ राजकुमार बिराजदार याच्या घरात ३ पिस्तूल व १८ जिवंत काडतूसं असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी या कारवाईत एकूण ४ पिस्तूल व २१ जिवंत काडतूस सापडले. पिस्तूल विक्रीसाठी त्यांनी आणले होते, अशीही माहिती समोर आली. ते कोठून आणले याचा तपास सुरू आहे. न्यायालयाने तिघांनाही ५ दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे. मुंबईत जीबीएसचा पहिला रुग्ण आढळला

RELATED ARTICLES

Most Popular