डांबरीकरणानंतरही मार्ग असुरक्षित, उपायांकडे लक्ष द्यावे अरुंद रस्ता, दरडीही धोकादायक – अणुस्कुरा घाट

155
Remedies should be taken into account Narrow road, also dangerous - Anuskura Ghat

रत्नागिरी जिल्हा व पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या राजापूर तालुक्यातील अणुस्कुरा घाटात गेल्या काही वर्षांत सातत्याने पावसाळ्यात अनेक ठिकाणी दरडी आणि मातीसह दगड पडण्याचे प्रकार घडत आहेत. घाटरस्त्यातील काही ठिकाणी विशेषतः वळणांच्या ठिकाणी रस्ता अरुंद असून, अनेक ठिकाणच्या दरडी धोकादायक स्थितीत आहेत.त्यामुळे रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले असले, तरी पश्चिम महाराष्ट्रातील दळणवळणाच्या दृष्टीने सुरक्षित असणारा अणुस्कुरा घाटमार्ग असुरक्षित होऊ लागला आहे. त्यामुळे हा घाटरस्ता कायमस्वरूपी निर्धोक होण्याच्या दृष्टीने उपाययोजनांची आवश्यकता आहे. अणुस्कुरा घाटातील रस्त्यामुळे राजापूर तालुका घाटमाथ्यावरील भागाशी जोडला गेला आहे. या मार्गाने कमी कालावधीमध्ये घाटमाथ्यावरील भागात जा-ये करणे सहज शक्य होत असल्याने या रस्ता ‘शॉर्टकट मार्ग’ म्हणून ओळखला जातो त्यामुळे वाहनचालकांकडून या मार्गाला प्राधान्य दिले जात असून या रस्त्यावरील वाहनांची वर्दळ वाढली आहे. घाटातील उंच डोंगरभागाचे कटिंग करून नागमोड्या वळणांचा हा निमनुष्य रस्ता तयार करण्यात आला आहे. या रस्त्यामध्ये अनेक ठिकाणी उंचच्या डोंगर, उभ्या रषेतील दरडी, मोठमोठ्या दगडी ठिकठिकाणी कधीही खाली स्थितीत आहेत.

कोसळण्याच्या गेल्या काही वर्षांत अतिवृष्टीच्या काळामध्ये धोकादायक दरडी, मोठमोठे दगड आणि माती पडून रस्ता काही काळापुरता बंद झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्याची पुनरावृत्ती गेल्या दोन वर्षामध्ये सातत्याने घडली आहे. या धोकादायक स्थितीमध्ये यावर्षीही फारसा फरक झालेला दिसत नाही सद्यःस्थितीत सुमारे तीन किमीच्या परिसरातील दरडी धोकादायक स्थितीत’ आहेत. नागमोड्या वळणाच्या येथे संरक्षण कठड्यांना वाहनांचा मागचा भाग लागून काही ठिकाणी कठडे तुटले आहे. त्यामुळे दरडीसह माती अन् दगड कोसळण्याची शक्यता आहे. पावसाळ्यातील संभाव्य धोक्यांच्या अनुषंगाने बांधकाम विभागाकडून योग्य त्या उपाययोजना केल्या असल्या तरी येणाऱ्या पावसाळ्यामध्ये त्याची सक्षमता स्पष्ट होणार आहे.