26.1 C
Ratnagiri
Thursday, August 7, 2025

गणेशोत्सव कालावधीत रेल्वेप्रवासात मिळणार आता उकडीचे मोदक

गणरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या प्रवाशांना वंदे भारत आणि...

पुनर्वसन वसाहत की, कचऱ्याचे डम्पिंग ग्राऊंड

मुंबई-गोवा महामार्गावर कोदवली ग्रामपंचायतीच्या हद्दीत पुनर्वसन वसाहत...

महाविकास आघाडीचा महावितरण अधिकाऱ्यांना सज्जड इशारा

दिवसात अनेकवेळा लाईट जात आहे.... तरीपण अवाच्यासवा...
HomeRatnagiriराज्यात सरकारमध्ये एकत्र असले तरीही जिल्ह्यात मात्र भाजप- शिवसेनेत दुरावाच

राज्यात सरकारमध्ये एकत्र असले तरीही जिल्ह्यात मात्र भाजप- शिवसेनेत दुरावाच

उलट या गटातील काही पदाधिकारी पालकमंत्री तसेच शिवसेनेवर टीका करताना दिसतात.

शिवसेना (शिंदे गट), भाजप राज्यात सरकारमध्ये एकत्र असले तरी रत्नागिरी जिल्ह्यात मात्र या दोन पक्षात काहीसा दुरावाच पाहायला मि त आहे. भाजपमध्ये दोन गट कार्यरत आहेत मात्र विद्यमान पदाधिकारी गट पालकमंत्र्यांपासून अंतर ठेवून वागत आहे. दुसरा गट मात्र काहीसा विकास कामांच्या संदर्भात पालकमंत्र्यांच्या संपर्कात असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गट असे महाविकास आघाडीचे सरकार आहे मात्र असे असले तरी यातील दोन मित्र पक्ष रत्नागिरीत शिवसेनेपासून काहीसे अंतर राखूनच आहेत. भाजपमधील काही नेते तर उघडपणे शिवसेनेच्या नेत्यांवर टीका करताना दिसत आहेत.

जाहिरातीच्या माध्यम जातून किंवा फलकबाजीतून हे पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावरही टीकाटीपणी केली जात आहे. मुळात भाजपमध्येच दोन गट कार्यरत आहेत. अनेकदा ही गटबाजी समोर आली आहे. आता पदाधिकारी असलेला गट पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या फारसा संपर्कात असल्याचे दिसत नाही. उलट या गटातील काही पदाधिकारी पालकमंत्री तसेच शिवसेनेवर टीका करताना दिसतात. मात्र दुसऱ्या बाजूने दुसरा गट हा विविध विकास कामांच्या संदर्भात पालकमंत्र्यांच्या संपर्कात असल्यास पाहायला मिळते. त्यामुळे या विषयाने आता नवे वळण गाठल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

नुकतेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रत्नागिरीच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी त्यांना आपल्या निवासस्थानी भेटीचे निमंत्रण दिले. मंत्रिमंडळातील सहकाऱ्याने दिलेल्या निमंत्रणाचा मान राखत ना. देवेंद्र फडणवीस यांनीही ना. सामंत यांच्या घरी पाहुणचार घेतला. मात्र यावेळीही भाजपचे पदाधिकारी उपस्थित राहिले नाहीत. याची सध्या जोरदार चर्चा होत आहे. दरम्यान स्थानिक पदाधिकारी जरी सोबत नसले तरी राज्यातला सर्वोच्च नेता सोबत आहे, हे या घटनेवरुन पालकमंत्री उदय सामंत यांनी दाखवून दिले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular