31 C
Ratnagiri
Sunday, November 23, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRatnagiriशासकीय रुग्णालयात कर्करोग रुग्ण तपासणी, केमोथेरपी उपचार मोफत

शासकीय रुग्णालयात कर्करोग रुग्ण तपासणी, केमोथेरपी उपचार मोफत

शासकीय रुग्णालयातील ओपीडी क्र. 2 येथे आठवड्यातील दर बुधवारी रुग्ण तपासणी व उपचार केले जातात.

वाढते कर्करोग रुग्णांचे प्रमाण बघता, जास्तीत जास्त लोकांना कर्करोगावर त्वरित तपासणी व उपचार करण्याकरिता जिल्हा शासकीय रुग्णालयातील ओपीडी क्र. 2 येथे आठवड्यातील दर बुधवारी लाईफकेअर हॉस्पिटल मधील विशेतज्ज्ञ डॉ. शुभम बगाडे यांच्यामार्फत कर्करोग रुग्ण तपासणी व उपचार केले जातात. तसेच महिन्यातून एक शुक्रवार डॉ. विक्रम घाणेकर, ऑंकोसर्जन यांच्यामार्फत रुग्ण तपासणी, केमोथेरपी उपचार मोफत करण्यात येतात. सर्व सुविधांचा लाभ घ्यावा व कर्करोगावर मात करावी. कर्करोगविषयक आरोग्य सल्ला मिळविण्यासाठी टोल फ्री क्रमांक 104 डायल करा,असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.भास्कर जगताप यांनी केले आहे. कर्करोग रुग्ण तपासणी त्वरीत, अचूक व अधिक सोईस्कररित्या करण्याकरिता डिजिटल उपकरणांचा वापर जिल्हयामध्ये करण्यात येत आहे.

ग्रामिण रुग्णालय पाली, राजापूर, देवरुख आणि उपजिल्हा रुग्णालय कामथे, दापोली येथे Quantified Health कंपनी मार्फत स्तन तपासणी करिता डिजिटल कोल्पोस्कोप उपलब्ध करुन देण्यात आला आहे. वाढत्या कर्करोगाचे प्रमाण कमी करणे व जास्तीत जास्त लोकांची तपासणी करुन त्यांना वेळीच उपचार आणि संदर्भ सेवा देण्याकरिता सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे दि. 4 फेब्रुवारी पासुन जागतिक कर्करोग दिनाचे औचित्य साधुन संपूर्ण राज्यामध्ये कर्करोग तपासणी व जनजागृती मोहिम सुरु करण्यात आली आहे. जिल्हयामध्ये सर्व ग्रामिण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र आणि जिल्हा सामान्य रुग्णालयमध्ये या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या मोहिमे दरम्यान जिल्हयातील 30 वर्षावरील लोकांचे मौखिक (Oral), स्तन (Breast) व गर्भाशय मुख (Cervix) कर्करोग या करिता सर्व आरोग्य स्थामध्ये तपासणी शिबीर आयोजित करण्यात येत आहेत.

प्रमुख 3 कर्करोग व लक्षणे :- मुख कर्करोग – 2 आठवडयांपेक्षा अधिक कालावधीसाठी तोंड येणे. तोंडामध्ये लाल किंवा पांढरा चट्टा असणे. तोंड उघडायला त्रास.

स्तन कर्करोग – स्तनांमध्ये गाठ, स्तनाच्या आकारात बदल, स्तनाग्रात (निप्पल) मध्ये पू किंवा रक्तस्त्राव.

गर्भाशय कर्करोग – मासिक पाळी व्यतिरिक्त योनितून रक्तस्त्राव, मासिक पाळीनंतरही रक्तस्त्राव होणे, शारिरिक संबंधानंतर योनीमार्ग रक्तस्त्राव, योनी मार्गातून दुर्गंधीयुक्त स्त्राव येणे. जिल्हयामध्ये जानेवारी 2024 ते डिसेंबर 2024 अखेरपर्यंत एकूण 41 कर्करोगाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी Oral Cancer -10, Breast Cancer – 14 Cervical Cancer – 1, Other Cancer – 16 अशी रुग्णसंख्या आहे. 4 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून सर्व रुग्णांवर जिल्हा शासकिय रुग्णालय येथे मोफत किमोथेरपी उपचार करण्यात येते.

RELATED ARTICLES

Most Popular