29.7 C
Ratnagiri
Wednesday, February 11, 2026

दहावी – बारावी परीक्षेपूर्वी बोर्डाचं ‘डिजिटल शस्त्र’

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उत्व माध्यमिक शिक्षण...

रत्नागिरीत ‘जनसुरक्षा’ कवच भक्कम जीवनज्योती विमा

सामान्य नागरिकांना आर्थिक प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारने...
HomeMaharashtraकेवळ “हे” सोडून, अनेक मविआ नेत्यांच्या सुरक्षेत कपात

केवळ “हे” सोडून, अनेक मविआ नेत्यांच्या सुरक्षेत कपात

पुन्हा एकदा मिलिंद नार्वेकर शिंदे गटात सामील होणार आहेत का? या बाबत राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत.

मुख्यमंत्री आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यात गेल्या काही दिवसात जवळीक वाढताना दिसत आहे. त्यांच्या गाठीभेटीही वाढलेल्या दिसून आल्या. गणेशोत्सवाच्या दरम्यान एकनाथ शिंदे हे नार्वेकर यांच्या घरी दर्शनासाठी देखील गेले होते. दरम्यान राज्य सरकारकडून मविआच्या अनेक दिग्गज नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली असून, मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत मात्र वाढ करण्यात आली. अशातच शिंदे गटाकडून नार्वेकर यांचं विशेष कौतुक करण्यात आलं आहे.

त्यामुळे पुन्हा एकदा मिलिंद नार्वेकर शिंदे गटात सामील होणार आहेत का? या बाबत राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. अशातच राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी देखील आज मिलिंद नार्वेकर यांच्याबद्दल वक्तव्य केलं आहे. ‘मी शिवसेनेत येण्याआधी मिलिंद नार्वेकर यांनी माझी उद्धव ठाकरे यांची भेट घालून दिली होती. ते सर्वाना कायमच मदत करतात. आम्ही सदैव मिलिंद नार्वेकरांसोबत आहोत, मिलिंद नार्वेकर शिंदे गटात येत असतील तर त्यांच आम्ही कायमच स्वागत करू असं वक्तव्य उदय सामंत यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

पुढे बोलताना उदय सामंत म्हणाले की. ‘आम्ही जरी आज तरी मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत नसलो तरी त्यांच्या बद्दल आम्हाला कायमच आदर आहे. प्रत्येक माणसाला मदत करणारी ती व्यक्ती आहे. मलादेखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून शिवसेनेत आणण्यात आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घडवून देण्यात मिलिंद नार्वेकर अग्रेसर होते. त्यामुळे आम्ही जरी शिंदेंसोबत असलो तरी मिलिंद नार्वेकर यांच्याबद्दल आमच्याकडून वाईट काढील चिंतणार नाही. मिलिंद नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांनादेखील राजकीय ताकद दिली होती”, असं म्हणत उदय सामंत यांनी एक प्रकारे नार्वेकर यांचं कौतुकच केलं आहे.

RELATED ARTICLES

Most Popular