तालुक्यातील विसापुर येथील एकाच कुटूंबातील चौघेजण बेपत्ता झाल्याची खळबळजनक घटना दापोलीत घडली आहे. या घटनेच्या मुळाशी जावून या प्रकारचा शोध घेण्याचे मुख्य आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. यामागे काही घरगुती भांडण किंवा अन्य काही घातपाताची परिस्थिती नाही ना? याचा केला आहे. तपास पोलिसांनी युध्दपातळीवर सुरू या घडल्या घटनेबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २ जुलै रोजी दापोली तालुक्यातील विसापूर गावातील पाथरीकोंड येथील आपल्या राहत्या घरातून भरत भेलेकर (३४) हा दुपारी २.३० च्या सुमारास त्याचा चुलत भाऊ सहदेव दत्ताराम भेलेकर यांच्यासोबत मंडणगड तालुक्याती कुंबळे या ठिकाणी लाकडी पट्ट आणणे करीता जात आहे, असे सांगू घरातून निघून गेला. तो अद्यापपर्यं घरी आलेलाच नाही.
दुकानात जात असे सांगून निघून गेलेल्या भरत भेलकरचा कुटुंबासह नातेवाईक मित्र मंडळीनी सर्वत्र शोध घेवून देखील तो कुठेच आढळून आला नाही. त्यामुळे तिच्या नातेवाईक व मित्रमंडळींकडेही चौकशी करण्यात आली. मात्र त्यांचा कोठेच ठावठिकाणा लागला नाही. दूरध्वनीवरही संपर्क केला गेला, मात्र संपर्कच होत नसल्यामुळे अखेर सुगंधा भेलेकर बेपत्ता झाल्याची तर आराध्य व श्री या दोघा लहान बालकांचे अपहरण झाल्याची फिर्याद दापोली पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी अज्ञातांविरोधात भा.द.वि.क. ३६३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा अधिक तपास दापोली पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस फौजदार मिलींद चव्हाण हे करत आहेत. तिच्या नातेवाईक व मित्रमंडळींकडेही चौकशी करण्यात आली. मात्र त्यांचा कोठेच ठावठिकाणा लागला नाही. दूरध्वनीवरही संपर्क केला गेला, मात्र संपर्कच होत नसल्यामुळे अखेर सुगंधा भेलेकर बेपत्ता झाल्याची तर आराध्य व श्री या दोघा लहान बालकांचे अपहरण झाल्याची फिर्याद दापोली पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी अज्ञातांविरोधात भा.द.वि.क. ३६३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास दापोली पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस फौजदार मिलींद चव्हाण हे करत आहेत.