अनेक गोष्टींमुळे वजन वारंवार वाढत असेल तर, वेळीच वैद्यकीय सल्ला घ्यावा. मुख्य म्हणजे आहार, झोप, पाणी, व्यायाम यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. एक किंवा दोन दिवसांमध्ये वजन कमी होत नाही. वजन वाढायला जसा वेळ लागतो तसेच कमी होण्यासाठी काही कालावधी हा लागतोच. जादू झाली आणि क्षणात वजन कमी झाले असे अजिबात होत नाही.
वाढलेले वजन कमी करण्यासाठी लोक जिममध्ये जाऊन तासनतास व्यायाम करत असतात. तर काही जण ऐकले कि लगेच वेगवेगळ्या प्रकारचे डाएट करत असतात. जर घरच्या घरी वजन कमी करायचे असेल तर दररोज सकाळी अनुशा पोटी भिजवलेले मेथीचे दाणे आणि ओवा टाकलेले पाणी प्या. जाणून घेऊयात मेथीचे दाणे आणि ओवा टाकलेल्या पाण्याचे शरीराला होणारे फायदे.
मेथीचे दाणे आणि ओव्यामध्ये अँटीऑक्सीडेंट मोठ्या प्रमाणात असतात. जे शरीरातील मेटाबॉलिजम वाढवून शरीर मजबूत करतात. ओवा आणि मेथीचे दाणे एकत्र केलेले पाणी दररोज प्यायल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी कमी व्हायला सुरुवात होते. जर प्रामाणिकपणे वजन कमी करायचे असेल उपायांमध्येही प्रामाणिकपणा असणे गरजेचे आहे. त्यासाठी दररोज एक ग्लास ओवा आणि मेथीचे दाणे टाकलेले पाणी पिणे आवश्यक आहे.
जर तुमची ब्लड शुगरची लेव्हल वाढत किंवा कमी होत असेल तर ती कंट्रोलमध्ये आणण्यासाठी मेथी आणि ओव्याने पचन क्रिया सुधारते. सकाळी रिकाम्या पोटी मेथीचे दाणे आणि ओवा मिक्स केलेले पाणी प्यायल्याने या पाण्यामुळे बॉडी स्ट्रेस देखील कमी होतो. मेथीचे दाणे आणि ओवा मिक्स केलेले पाणी हे बॉडी डिटॉक्स ड्रिंक आहे. यामध्ये अॅंटीऑक्सीडेंट, विटामिन सी आणि प्रोटीन हे पोषक घटक असतात. या पाण्याने शरीरात इम्यूनिटी देखील वाढते.
ओवा आणि मेथी दाणेसह, अनेक पदार्थांमध्ये जिऱ्याचा वापर होतो. जेवण तयार करताना फोडणीमध्ये जिऱ्याचा वापर केला जातो. जिऱ्यामुळे वजन देखील कमी होते. जिऱ्याचे पाणी प्यायल्याने शरीरातील फॅट्स विरघळून जातात. घरच्या घरी जिऱ्याचे पाणी तयार करू शकता. जाणून घेऊया पद्धत.
जीरं रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवावे. सकाळी या पाण्यात थोडी दालचिनी पावडर टाकणे. रोज हे पाणी सकाळी प्या. दालचिनीमध्ये अॅंटी इंफ्लेमेटरी गुण असतात. जे शरीरातील ग्लूकोजची पातळी स्थिर ठेवतात. प्रयत्न करून जरूर बघा पण त्याआधी वैद्यकीय सल्ला जरूर घ्या.