28.6 C
Ratnagiri
Sunday, January 25, 2026

उपनगराध्यक्ष-अभियंता यांच्यात खडाजंगी रत्नागिरी नगरपालिका

रत्नागिरी नगरपालिकेच्या आवारात आज सायंकाळी उपनगराध्यक्ष समीर...

शहरातील अतिक्रमणांवर आज हातोडा रत्नागिरी पालिका आक्रमक

शहरातील अतिक्रमणाविरोधात पालिका आक्रमक झाली आहे. यातून...

दापोलीत ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज अवैध

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरू...
HomeRatnagiriकिरीट सोमय्यांची भाजपमधून हकालपट्टी करा - विलास चाळके

किरीट सोमय्यांची भाजपमधून हकालपट्टी करा – विलास चाळके

एका बाजूला मराठी माणूस आणि विरोधी पक्षनेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून बदनाम करणाऱ्या सोमय्यांचे आता खरे रूप जनतेपुढे आले आहे.

ज्या किरीट सोमय्यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर, मराठी माणसावर खोटे आरोप केले, त्या सोमय्यांचे अनेक अश्लील व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. एका बाजूला मराठी माणूस आणि विरोधी पक्षनेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून बदनाम करणाऱ्या सोमय्यांचे आता खरे रूप जनतेपुढे आले आहे. आमची मागणी आहे, त्यांच्यावर गृहविभागाने कडक कारवाई करून पक्षातून हकालपट्टी करावी अन्यथा संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल, अशी प्रतिक्रिया ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विलास चाळके यांनी दिली. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचे अश्लील संतापजनक व्हिडिओ व्हायरल झाला. यावरून राज्यभरात प्रचंड गदारोळ सुरू आहे.

ठाकरे शिवसेनेने सोमय्या यांच्या विरोधात जिल्हा संपर्क कार्यालयासमोर निदर्शने केली. त्यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन करण्यात आला. यावेळी घोषणाबाजी करत तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. प्रतिकात्मक पुतळ्याला जोडेही मारण्यात आले. यानंतर प्रतिक्रिया देताना विलास चाळके म्हणाले, बेटी बचाओचा नारा देणाऱ्या भारतीय जनता पक्षापासून आता बेटीला वाचवायला पाहिजे, अशी म्हणण्याची वेळ आली आहे. किरीट सोमय्यांनी आतापर्यंत शिवसेना, विरोधी पक्षनेते आणि मराठी माणसावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यांना अनेक खोट्या केसेसमध्ये फसवले. आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेकडे आमचे लक्ष आहे. सोमय्या यांची पक्षातून हकालपट्टी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी.

RELATED ARTICLES

Most Popular