27.6 C
Ratnagiri
Sunday, August 31, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeRatnagiriएक्सप्रेस गाड्यांना "या" स्थानकात थांबा देण्याची उद्योगमंत्र्यांकडे मागणी

एक्सप्रेस गाड्यांना “या” स्थानकात थांबा देण्याची उद्योगमंत्र्यांकडे मागणी

कोरोनानंतर दिवा सावंतवाडी व मुंबई कडे जाणारी या गाडीचा थांबा रद्द करण्यात आला.

रत्नागिरी तालुक्यातील उक्षी रेल्वे स्थानकावर दिवा-सावंतवाडी, तुतारी एक्स्प्रेस थांबण्यासाठी ग्रामस्थांनी ना.उदय सामंत यांची नुकतीच भेट घेतली आणि या स्थानकावर गाड्या थांबण्यासाठी निवेदन अर्जही दिला आहे. रत्नागिरी संगमेश्वर या दोन्ही तालुक्याच्या मध्यभागी असलेले कोकण रेल्वेचे उक्षी स्टेशन हे अती दुर्गम भागात आहे. येथील जाकादेवी पंचक्रोशी व खाडी पट्ट्यातील जवळ जवळ पंचवीस ते तीस गावातील प्रवासी या स्टेशनवरून प्रवास करत असतात.

रत्नागिरी व संगमेश्वर या दोन्ही तालुक्याची जाकादेवी, चवे, ओरी, तरवळ, आगवे, विल्ये, बोंड्ये, पोचरी, मेढे, मांजरे, उपळे, बडावखोल, नार्शिंगे, राई, रानपाट, कोंड्ये, फुणगुस, उक्षी,वांद्री, देन, परचुरी, आंबेड बुद्रुक, कोळंबे, मानस्कोंड, डींगणी अशा अनेक गावातील प्रवाशांच्या फायद्याचे हे स्टेशन आहे. कोकण रेल्वे सुरू झाल्यापासून या ठिकाणी दोन्ही वेळेत जाणाऱ्या व येणाऱ्या पेसेंजर गाड्या थांबा घेत होत्या. कोरोना महामारीचे देशावर संकट आल्यावर बंद असलेली रेल्वे सेवा पुन्हा सुरू करण्यात आली. कोरोनानंतर दिवा सावंतवाडी व मुंबई कडे जाणारी या गाडीचा थांबा रद्द करण्यात आला. परंतु, या गाड्या पुन्हा थांबण्यासाठी रिक्षा चालक व मालक संघटनेचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन समस्येची कल्पना दिली.

याची दखल घेत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी त्वरित केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांना तसे पत्रही दिले आहे. या वेळी उक्षी गावचे माजी सरपंच मिलिंद खानविलकर, उपसरपंच हरिश्चंद्र बंडबे, पांडुरंग पाताडे, ओमकार घडशी, सुशांत मेस्त्री, सुरेंद्र देसाई, संदीप सापटे, संभाजी दुदम इत्यादी रिक्षा चालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular