22.8 C
Ratnagiri
Saturday, January 17, 2026

जिल्ह्यातील खारफुटी संवर्धन प्रक्रियेला गती

कोकणासह जिल्ह्यातील खारफुटी संवर्धन प्रक्रियेला गती मिळाला...

हातखंब्याजवळ अपघात, मोटरची दुचाकीला धडक, दापत्य जखमी

रत्नागिरी ते हातखंबा जाणाऱ्या मार्गावरील खेडशी महालक्ष्मी...

जि.प. निवडणुकांसाठी जिल्ह्यात महायुती शिवसेना-भाजपसोबत राष्ट्रवादीही येणार?

५ फेब्रुवारीला होणारी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी...
HomeRatnagiriरत्नागिरीतील खरवते गावात वणव्यात मोठ्या प्रमाणात बागायतीचे नुकसान

रत्नागिरीतील खरवते गावात वणव्यात मोठ्या प्रमाणात बागायतीचे नुकसान

शेकडो लोक हातात झाडांचे टाळे घेऊन आग विझविण्यासाठी धाव घेतली.

तालुक्यातील तिवराड-कोतवडे मार्गावरील खरवते गावात रस्त्यालगत वणवा लागल्याने मोठ्या प्रमाणात बागायतीचे नुकसान झाले. दुपारच्या सुमारास हा वणवा लागला आणि काही क्षणातच अनेक एकरचे क्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. वानराने झाडावरुन उडी म ारली यावेळी तो विद्युतभारीत तारेवर पडला. यामुळे शॉर्टसर्कीट होऊन आग लागल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या अग्नी प्रलयात वानरही मरुन पडला. खरवते येथील माजी सरपंच विनोद जोशी, माजी उपसरपंच प्रवीण जोशी यांना आगीचे वृत्त कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्यासोबत खरवते गावातील शेकडो लोक हातात झाडांचे टाळे घेऊन आग विझविण्यासाठी धाव घेतली. शेजारच्या जांभरुण तसेच खरवते गावातूनही लोक पाण्याचे साठे भरुन धावू लागले. नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाला खबर देण्यात आली.

अवघ्या २० ते २५ मिनिटात अग्निशामक दाखल झाला. याच दरम्यान मिऱ्या येथील श्री. सावंत हे आंबा बागायतदार फवारणीसाठी पाण्याचे मोठ्या टाक्या भरुन टेम्पोने आपल्या बागेकडे जात होते. त्यांनी हा अग्निप्रलय पाहताच त्या दिशेने आपली गाडी वळवली व आग विझविण्यासाठी पाणी उपलब्ध करुन दिले. फवारणीच्या पंपाच्या सहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न सुरु होता. अखेर २ ते ३ तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. खरवते गावातील सरपंच विजय सकपाळ, पोलीस पाटील संतोष सकपाळ तसेच ग्रामस्थ श्री. माटव, श्री. मांडवकर यांनी जीवाची बाजी लावत आग विझविण्याचे काम केले. 

कोतवडे येथील चंद्रकांत सुर्वे यांनी आंबे फवारणीचा पंप घेऊन तर येथील रमाकांत घाणेकर यांनी मोठी पाण्याची टाकी घेऊन जात आग विझविण्यास मदत केली. रत्नागिरीतील नवलाई ट्रान्सपोर्टच्या वाहनाने फवारणीचा पंप आणून आग विझविण्यात आग विझविण्यात योगदान दिले. कोतवडे गावातून प्रवीण चव्हाण, केदार लाड, अनंत सनगरे, मंगेश मांडवकर, प्रणव घाणेकर, मनोज सनगरे, ओंकार धुंदूर, अजय मयेकर, बबन ठोंबरे, रुपेश घाणेकर, कोतवडे सरपंच संतोष बारगुडे, जांभरुणचे उप सरपंच मंदार थेराडे यांनी गावातील आपल्या सहकाऱ्यांना घेत या ठिकाणी धाव घेतली आणि आग आटोक्यात आणण्यासाठी मदत केली. नजीकच महावितरणचे कार्यालय आहे. तेथील कर्मचाऱ्यांनीही मदतीसाठी धाव घेतली. आग आटोक्यात येताच सर्वांनी निःश्वास सोडला. मात्र तोवर काही एकर क्षेत्रातील गवत पूर्णपणे जळून खाक झाले. नजीकच्या आंबा बागायतीला या आगीची झळ पोहोचली. मात्र आग आटोक्यात आल्याने नजीकच असलेल्या मोठमोठ्या आंब्याच्या बागा बचावल्या.

RELATED ARTICLES

Most Popular