राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि सर्वेसर्वा मा. शरद पवार यांचा हुबेहुब आवाज काढून पैशाची मागणी केल्याची घटना समोर आलेली आहे. याप्रकरणी प्रताप खांडेभराड यांनी पोलिस स्थानकामध्ये फिर्याद केलेली आहे आणि त्यानुसार पुणे येथील चाकण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्याजी घेतलेल्या पैशाच्या प्रकरणा वरूनच हा गुन्हा घडला आहे.
आरोपी धीरज गुरव यांनी २०१४ रोजी प्रताप यांना एक कोटीहून अधिकची रक्कम दिली होती आणि त्याचे सावकारी व्याज लावून जवळपास पाच कोटीची रक्कम ही धीरज प्रताप यांच्याकडून मागत होता. त्याच्या मोबदल्यात धीरज याने प्रताप यांच्याकडून तेरा एकर जमीन देखील आपल्या नावावर करून घेतली परंतु त्याचे सावकारी व्याज हे संपेना, त्यासाठी प्रताप यांच्याकडून पैशाची मागणी हा करतच राहिला.
प्रताप पैसे देत नाही हे लक्षात आल्यावर धीरज याने शरद पवार यांच्या मुंबई निवास स्थानावरील लँडलाईन क्रमांकावर कॉल करून स्वतः शरद पवार असल्याचे भासवले यासाठी एका सॉफ्टवेअरची मदत घेत शरद पवार यांच्या आवाजाची नक्कल काढत पैशाची मागणी प्रताप यांच्याकडून केली. प्रताप यांना ही गोष्ट समजून चुकल्यामुळे त्यांनी पुणे येथे धीरज आणि त्यांचे साथीदार विरुद्ध गुन्हा दाखल केला. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन लगेच कारवाई केली आणि या गुन्ह्यातील धीरज गुरव याच्यासह तिघांना अटक करण्यात आली सध्या तिघेही गुन्हेगार मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहेत.