28.7 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

“आम तो आम और गुटली का भी दाम” असा हा प्रकल्प : अनिकेत सुर्वे

"आता वाटद दशक्रोशीतील युवकांनी निर्धार केला आहे,...

स्मार्ट वीजमीटरचा निर्णय रद्द करायला लावू – लियाकत शाह

स्मार्ट वीजमीटर बसवल्यानंतर वाढीव वीजबिले येत असल्याच्या...

रत्नागिरीत अमली पदार्थ बाळगणारे ७ जण अटकेत

शहराजवळील भाट्ये गावामध्ये गांजा बाळगणाऱ्या ५ तरुणांविरुद्ध...
HomeMaharashtraक्रुझ ड्रग्ज प्रकरण, नवाब मालिकांचे आरोपावर आरोप सुरूच

क्रुझ ड्रग्ज प्रकरण, नवाब मालिकांचे आरोपावर आरोप सुरूच

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी बोगस जात प्रमाणपत्र दाखवून शासकीय नोकरी मिळवली असल्याचा आरोप केला होता. या खोट्या आरोपाना त्रस्त होऊन, याविरोधात वानखेडेंचे वडिल ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिकांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे.

काही दिवसांपूर्वी वानखेडे यांचा जन्म दाखला सोशल मीडियावर व्हायरल होत होता. त्यावेळी सोशल मीडियात व्हायरल होत असलेला जन्म दाखला हा खोटा आहे, आणि या सुरु असलेल्या खोडसाळपणा विरोधात मी कोर्टात चॅलेंज करणार आहे असा इशारा देखील वानखेडे यांनी दिला होता. सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या शाळा सोडल्याच्या दाखल्या बाबत वानखेडे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर समीर वानखेडे यांचं समीर दाऊद वानखेडे असं नाव असल्याचं पाहिला मिळत आहे. शिवाय यावर समीर वानखेडे यांचा धर्म मुस्लिम असल्याचं देखील दाखल्याम्ध्ये दिसून येत आहे. एक दाखला सेंट जोसेफ हायस्कूल वडाळा, तर दुसरा सेंट पॉल हायस्कूल दादर या शाळांचा आहे. त्यामुळे या दोन्ही दाखल्यांबाबत आणि यावर उल्लेख असलेल्या धर्मा बाबत एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे काय भूमिका जाहीर करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

समीर वानखेडे यांच्या जन्माचा दाखला नवाब मलिक यांनी सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरने पती समीर वानखेडे यांच्या जन्माचा दाखला सोशल मीडियावर पोस्ट केला होता. परंतु काही वेळानंतर क्रांती रेडकरने ती पोस्ट डिलीट केली. वानखेडेंच्या दाखल्याची पोस्ट मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular