26.4 C
Ratnagiri
Sunday, August 3, 2025

मुहूर्ताच्या दिवशी पावसाचा खोडा केवळ २० टक्के नौका समुद्रात

शुक्रवारपासून मासेमारीवरील बंदी उठल्यानंतर पहिल्याच दिवशी स्थानिक...

“आम तो आम और गुटली का भी दाम” असा हा प्रकल्प : अनिकेत सुर्वे

"आता वाटद दशक्रोशीतील युवकांनी निर्धार केला आहे,...

स्मार्ट वीजमीटरचा निर्णय रद्द करायला लावू – लियाकत शाह

स्मार्ट वीजमीटर बसवल्यानंतर वाढीव वीजबिले येत असल्याच्या...
HomeRatnagiriमहिलेच्या जागरूकतेमुळे दागिने पॉलिश करणारे भामटे पोलिसांच्या ताब्यात

महिलेच्या जागरूकतेमुळे दागिने पॉलिश करणारे भामटे पोलिसांच्या ताब्यात

एका महिलेच्या घरी ते गेले असता भांडी व बांगड्या पॉलिश करून देतो असे सांगून सोन्याच्या काही वस्तू आहेत का विचारू लागले.

हल्ली सोन्याचे दागिने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने हातोहाथ दागिने पळविण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहेत. घरात वृद्ध किंवा एकट्या महिला असल्याचे बघून काहीतरी कारण काढून त्यांच्या घरात शिरतात आणि मग किमती वस्तू, सोन्याचे ऐवज घेऊन पोबारा करतात. पोलीस अनेक वेळा या प्रकरण बाबत जनजागृती करत असतात, परंतु हे भुरटे चोर अशाच घरात घुसतात, जिथून त्यांच्या मदतीला कोणी येऊ शकणार नाही.

गुहागर तालुक्यातील तळवली येथे काल दुपारी दोन युवक तांबे – पितळची भांडी व बांगडया साफ करणारे असे ओरडत फिरत होते. यावेळी एका महिलेच्या घरी ते गेले असता भांडी व बांगड्या पॉलिश करून देतो असे सांगून सोन्याच्या काही वस्तू आहेत का विचारू लागले. महिलेला त्यांच्यावर संशय दटावला म्हणून  तिने आमच्याकडे काही नाही सांगून त्याना जाण्यास सांगितले. जाण्यास सांगूनही दागिन्यांसाठी विचारणा करत होते. शेवटी त्या महिलेने हळूच बाहेर जाऊन शेजारील लोकांना हा सारा प्रकार सांगितला.

त्यानंतर शेजारी पाजारी सर्व एकत्र आले आणि त्यांनी दोघांना पकडले. याबरोबर ते दोघे घाबरून गेले. जमावाने त्यांची संपूर्ण माहिती विचारुन घेतली असता, ते बिहार येथून चिपळूणला आले व तेथून तळवली येथे आले असल्याचे कळले. त्यांनी सोबत आणलेले आधारकार्ड सुद्धा बोगस असल्याचे निदर्शनास आले. आता आपली सुटका नाही हे कळताच त्यांनी तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. याचवेळी ग्रामस्थांनी पाठलाग करून त्यांना पकडले आणि चांगला चोप दिला. त्यानंतर ग्रामस्थांनी दोघांना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular