26.5 C
Ratnagiri
Saturday, July 5, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeRatnagiriतोतया पोलिसाचा अल्पवयीन मुलीने डाव उधळला

तोतया पोलिसाचा अल्पवयीन मुलीने डाव उधळला

मुलीने बुद्धी चातुर्याने आणि दाखवलेल्या प्रसंगावधानपणामुळे, त्याचा मोबाईल क्रमांक प्राप्त केला होता. त्यामुळे पोलिस त्याचा माग घेऊ शकले.

बनावट पोलिस असल्याचे भासवून, एका अल्पवयीन मुलीचे लैगिंक शोषण करण्याचा तोतया पोलिसाचा डाव मुलीने दाखवलेले धाडस आणि हुशारीमुळे उधळून लावला. संबंधित तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.

गुहागरच्या किनाऱ्यावर अल्पवयीन मुलगी दुपारी मित्रांसोबत फिरायला आली होती. यावेळी उमेश शिगवण वय २६, रा. निगुंडळ नामक इसमाने तिला हेरले. आपण पोलिस असल्याची बतावणी केली. तू माझ्यासोबत पोलिस ठाण्यात चल, असे सांगत तिला पोलिस ठाण्याच्या मागे असलेल्या समुद्रकिनाऱ्यावर घेऊन गेला. तिथे गुहागरचे पोलिस कडक असून, ते तुला तुरुंगामध्ये टाकतील. त्यापेक्षा शृंगारतळीच्या पोलिस ठाण्यात जाऊया. तिथले पोलिस चौकशी करून तुला घरी सोडतील, असे उमेशने तिला सांगितले आणि तिला रिक्षात बसवून शृंगारतळीकडे रवाना झाला. मुलीने बुद्धी चातुर्याने आणि दाखवलेल्या प्रसंगावधानपणामुळे, त्याचा मोबाईल क्रमांक प्राप्त केला होता. त्यामुळे पोलिस त्याचा माग घेऊ शकले.

उमेश पाटपन्हाळे कॉलेज जवळ आल्यावर रिक्षा सोडली. आता माझी ड्युटी संपत आहे. पुढची ड्युटी करणारा पोलिस इथेच राहतो. त्याच्याकडे आपण जावू. त्यानंतर तुला आम्ही घरी सोडू , असे सांगून पाटपन्हाळे कॉलेज परिसरातील निर्जन जंगल भागात उमेश तिला घेवून गेला. तिथे सोडण्यासाठी तू काय देशील असे विचारात उमेशने मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. तेव्हा आपल्या बरोबर काहीतरी चुकीचे घडत आहे, हे तिच्या लक्षात आल्यावर मुलीने तिथून पळ काढला आणि ती गुहागर-शृंगारतळी या रहदारीच्या रस्त्यावर आली.

आता काही मुलगी आपल्या तावडीत सापडू शकत नाही, हे समजून आल्यावर उमेशने तेथून पळ काढला. मुलगी घरी उशिरा पोहोचल्यामुळे पालकांनी चौकशी केली. त्यावेळी तिने सर्व कहाणी कथन केली. एका पोलिसाने पकडले व तो पोलिस ठाण्यात घेवून जात होता, असे सांगितले. तसेच उमेशचा मोबाईल क्रमांकही दिला. मग पालकांनी गुहागर पोलिस ठाण्यातील पोलिसांना याबाबत माहिती दिली.

मुलीच्या पालकांनी विश्वासात घेवून तिची चौकशी केल्याने तिने संपूर्ण हकिगत सांगीतली. एक प्रकारे हि गंभीर बाब असल्याचे समोर आल्यावर पालकांनी तक्रार दाखल केली. पालकांनी तक्रार केल्यानंतर चार पोलिसांचे पथक उमेश शिगवणच्या मागावर गेले. लैगिक अपराधापासून बालकाचे संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular