24.8 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeRatnagiriरत्नागिरी वनविभाग कर्मचारी भरतीची “ती” जाहिरात बनावट

रत्नागिरी वनविभाग कर्मचारी भरतीची “ती” जाहिरात बनावट

हल्ली विविध ऑनलाईन शासकीय खोट्या नोकरीच्या संधी उपलब्ध अशा जाहिराती सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रसिद्ध झालेल्या दिसतात. अशीच एक बनावट जाहिरात रत्नागिरीच्या वनविभागात कर्मचारी भरतीची एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. या जाहिरातीमुळे वन विभागात एकच खळबळ उडाली आहे.

अर्जदाराकडून अर्ज मागविण्यात बरोबर त्याची फीच्या माध्यमातून आर्थिक लूट होऊ शकते हा धोका त्वरित लक्षात घेऊन, येथील वनविभागाने याप्रकरणी चिपळून पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. रत्नागिरी वनविभाग रत्नागिरी कर्मचारी भरतीची हि बनावट जाहिरात सांगलीतील एका वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आलेली.

या बनावट जाहिरातीमध्ये रत्नागिरी उपविभागीय वन अधिकारी कार्यालयामध्ये फिल्ड ऑफिसर, वनरक्षक, चालक, डिप्टी रेंजर आणि निरीक्षक या पदासाठी भरती सुरु असून इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. जाहिरात देणाऱ्याने आपले दोन मोबाईल क्रमांक जाहिरातीमध्ये दिले आहेत. अर्जदाराने व्हाट्सअपच्या माध्यमातून आपली कागदपत्रे आणि अर्ज करावेत असे आवाहनही करण्यात आले होते. सांगली जिल्ह्यात ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर सांगली जिल्ह्यातील वाइल्ड लाइफ कंट्रोल ब्युरोचे सदस्य पापा पाटील यांनी रत्नागिरी वन विभागाशी संपर्क साधून या जाहिराती बाबत माहिती दिली.

यासंदर्भात रत्नागिरी वन विभागातील अधिकाऱ्यांनी जिल्ह्यामध्ये अशी कोणतीही कर्मचारी भरती होत नाही आहे, आणि जेंव्हा भरती करायची असेल तेंव्हा शासना मार्फत त्याची रीतसर जाहिरात प्रसिद्ध केली जाईल. हे अयोग्य कृत्य कोणी केले असल्याचे माहित नाही असा अधिकाऱ्यांनी खुलासा केला. त्यानंतर तातडीने वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संबंधित जाहिरात देणाऱ्याचा शोध घेण्यास सुरुवात केली पण जाहिरातीमधील मोबाईल क्रमांक हे वारंवार बंद असल्याचे लक्षात आल्यानंतर ही बनावट जाहिरात आहे हे स्पष्ट झाले यातून लोकांची आर्थिक फसवणूक होऊ नये यासाठी वन विभागाने जाहिरात देणाऱ्या संबंधित व्यक्तीच्या विरोधात चिपळूण पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular