27.2 C
Ratnagiri
Tuesday, October 22, 2024
HomeRatnagiri"तो" व्हिडिओ खोटा- रत्नागिरी जिल्हा प्रशासन

“तो” व्हिडिओ खोटा- रत्नागिरी जिल्हा प्रशासन

सोशल मिडीयामुळे देशा विदेशातील बातम्या अगदी क्षणामध्ये जनतेला कळतात. काही वेळेला अनेक खोट्या बातम्या सुद्धा इतक्या व्हायरल होतात कि अनेक अफवांना उधाण येते. अशी अनेक उदाहरणे आपण सतत पाहतच असतो. एखाद्या वेळी कोणाची हरवल्याची पोस्ट शेअर केलेली असेल, तर ती हरवलेली व्यक्ती घरी परतली तरी सुद्धा या पोस्ट व्हायरल होतचं राहतात. त्यामुळे अशा बातम्या पसरविण्यामुळे नाहक मनस्ताप त्या व्यक्ती आणि कुटुंबाला सहन करावा लागतो. त्यामुळे शेअर करण्यापूर्वी एखाद्या बातमीची सत्यता पडताळून पाहणे गरजेचे आहे.

सध्या रत्नागिरीमध्ये १ जुलै ते ८ जुलै पुन्हा कडक लॉकडाऊन करण्यात येणार असल्याचा एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीचा व्हिडीओ सगळीकडे सोशल मिडीयावर व्हायरल होताना दिसत आहे. या प्रसिद्ध वृत्तवाहिनीचा व्हायरल झालेला व्हिडीओ हा २९ जून २०२० असून त्याला एडीट करून कुणीतरी खोडसाळपणा केल्याचे निदर्शनास आले आहे.  सदर व्हिडीओ हा १ वर्षापूर्वीचा असून हा व्हिडीओ पाहून अनेकजण फसले गेल्याचे पहावयास मिळत आहे.

रत्नागिरी मध्ये असलेल्या कोरोनाच्या स्थितीमुळे अशा प्रकारचे अफवा पसरवणारे मेसेज अथवा व्हिडीओ पसरविणाऱ्याना अजून जोश येतो. रत्नागिरी जिल्हा शासनाच्या निर्धारित कोरोना धोरणाप्रमाणे चौथ्या टप्प्यात अनलॉक झाला आहे, त्यामुळे सध्या ७०% रत्नागिरीतील दुकाने, व्यवसाय सुरु आहेत. आधीच कोरोना महामारीच्या भीतीमुळे जनमानसात नैराश्येचे वातावरण आहे, आणि त्यात या अशा अफवा पसरविणाऱ्या बातम्या ऐकल्यावर अजून मानसिक स्थिती बिघडते. जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट दिवसेंदिवस कमी होत असून लवकरच कडक निर्बंधातून शिथिलता मिळण्याची शक्यता असताना का अशा अफवा पसरविल्या जातात !

RELATED ARTICLES

Most Popular