29.2 C
Ratnagiri
Sunday, July 13, 2025

सावर्डेत मत्स्यपालन, कुक्कूटपालन, कृषी पर्यटनाची शेतीला जोड

वडिलोपार्जित पारंपरिक शेतीला बाजारातील मागणीचा लाभ घेऊन...

चिपळुणात सदोष स्मार्ट मीटर बसवू नका…

स्थानिकांचा विरोध असतानाही अदानी पॉवर कंपनीने जुने...

चिपळूण घरकुलाचे स्वप्न जमीनदोस्त, तहसीलदारांकडे तक्रार

तालुक्यातील कादवड-सुतारवाडी येथील शासकीय योजनेतून मंजूर झालेल्या...
HomeMaharashtraमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला विशेष नामांकन

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला विशेष नामांकन

जगभरामध्ये विविध प्रकारच्या प्रदूषणाची उदाहरणे आपण पाहतो. कोरोनाच्या या काळामध्ये देशभर विविध ठिकाणी संचारबंदी  केलेली गेली असल्याने वायू प्रदुषणामध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेली निरीक्षणात आली. वाहने, औद्योगिक कंपन्या यांच्या इंधनामुळे होणाऱ्या वायूप्रदुषणामध्ये या कोरोनाच्या महामारी काळामध्ये खूप बदल जाणवला आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला प्रदूषण नियंत्रणाकरिता आणि कामकाज संपूर्णपणे संगणीकरणाच्या माध्यमातून मंडळाच्या कामामध्ये लक्षणीय सुधारणा घडून आल्या आहेत आणि ऑनलाईन कामाचा दर्जा सुद्धा वाढला असल्याने, मंडळाला आयएसओ ९०००:२०१५ मानांकन देऊन प्रमाणित करण्यात आले आहे.  त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संगणीकरणाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या विविध सेवांसाठी मंडळाचे तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण असे डेटा सेंटर चालवले जाते. या डेटा सेन्टरच्या सुरक्षा आणि राज्यभरातील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विविध समायोजित कार्यप्रणालीला आयएसओ ने  २७००१:१३ याने प्रमाणित केले आहे.

संगणीकरणाच्या माध्यमातून राज्यातील औद्योगिक आस्थापनांना सुलभ सेवा देण्याच्या उद्देशाने मंडळाचे बहुतांशी कामकाज हे ऑनलाईन प्रणालीद्वारेच केले जाते. या कामकाजाची गुणवत्ता तपासून पाहण्यासाठी आयएसओकडे सादर करावी लागते. या गुणवत्ता सिद्ध करण्यासाठीच्या सादर करण्यात आलेल्या कामकाज पद्धतीला नामांकन मिळाल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. या दोन्ही मिळालेल्या मानांकनामुळे भविष्यामध्ये मंडळाच्या सेवा वेगवान गतीने आणि जास्त कार्य कुशलतेने राबविणे सहज शक्य होणार आहे.

MPCB

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नामांकन मिळविण्यासाठी विशेष परीश्रम मंडळाचे अध्यक्ष सुधीर श्रीवास्तव, सदस्य सचिव अशोक सनगरे यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक सचिव मिराशे, सांख्यिकी अधिकारी सोनावणे इतर अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने घेतले.

RELATED ARTICLES

Most Popular