26 C
Ratnagiri
Sunday, August 31, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeRatnagiriसिलेंडरच्या स्फोटात संगमेश्वरातील कुटुंबावर मोठा घाला

सिलेंडरच्या स्फोटात संगमेश्वरातील कुटुंबावर मोठा घाला

भोजने यांच्या घरात गॅस पाईपलाईनची जोडणी अर्धवट अवस्थेत होती.

कोल्हापूर येथे ही दुर्घटना घडली आहे. गणेशोत्सवासाठी कोल्हापूरहून आपल्या मूळ गावी म्हणजेच संगमेश्वर तालुक्यातील शिवणे गावी भोजने कुटुंब येण्याची तयारी करत असतानाच त्यांच्यावर काळाने घाला घातला आहे.

एका निर्णयाने सारं बदललं – अमर भोजने हे गेली चार वर्षे कुटुंबासह कोल्हापुरात वास्तव्यास होते. ते एलआयसी कॉलनीजवळील एका भागात राहत होते आणि हॉटेलमध्ये कुक म्हणून काम करत होते. गणेशोत्सवासाठी कुटुंबाने मूळ गावी जाण्याचा बेत आखला होता. मात्र, अमर यांची रात्रपाळीची ड्युटी असल्याने ‘एक रात्र थांबून सकाळी निघू’ असा निर्णय घेतला गेला. याच निर्णयाने त्यांचं आयुष्य बदलून टाकलं.

अचानक स्फोट झाला – भोजने यांच्या घरात गॅस पाईपलाईनची जोडणी अर्धवट अवस्थेत होती. घराबाहेर खिडकीजवळ गॅस मीटर बसवण्यात आला होता. मात्र, गॅस सुरू झाला होता, याची कल्पना कुटुंबाला नव्हती. रात्री शीतल यांनी जेवण गरम करण्याचा प्रयत्न करताच अचानक स्फोट झाला आणि क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. या दुर्घटनेत शीतल अमर भोजने यांचा मृत्यू ओढवला असून त्यांचे सासरे आणि दोन चिमुरडी मुले जखमी झाली आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

गावकरी कोल्हापूरला – घटनेची माहिती मिळताच शिवणे गवळवाडी गावातील ग्रामस्थांनी कोल्हापुरात धाव घेतली. सरपंच राजू पवार यांनी त्यांच्या नातेवाइकांकडे कुटुंबाची विचारपूस केली आणि ग्रामपंचायतीमार्फत सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. ही घटना अवघ्या गावासाठीच नव्हे तर कोकणात गणेशोत्सवाच्या सणात रंगलेल्या प्रत्येकासाठी धक्का देणारी आहे. दोन चिमुकल्या जीवांनी आई गमावली, तर एका पित्याने पत्नी आणि वृद्ध वडिलांच्या जीवनासाठी धडपड सुरू ठेवली आहे. या कुटुंबाला सावरण्यासाठी शासन, समाज आणि नागरिकांनी एकत्र येणे काळाची गरज आहे.

RELATED ARTICLES

Most Popular