रत्नागिरीमध्ये मागील आठवडा पावसाने दडी मारली आहे. लावण्यांची कामे खोळबल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. हवामानशास्त्र विभागाने १० जुलैपर्यंत राज्यात मोठा पाऊस पडणार नाही,असा अंदाज वर्तवला आहे. पावसाच्या वेळेवर आणि दमदार आगमनानंतर गेल्या आठ दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने जुलैचा पहिला आठवडा उन्हामुळे घामाच्या धारा लागल्या होत्यात. लावणीची रोपे काढून ठेवल्याने आणि पावसाचा काहीच ठावठिकाणा नसल्याने शेतकरी काळजीत दिसत आहे.
आठवडाभराच्या विश्रांतीनंतर अखेर पावसाची पुन्हा सुरुवात झाली आहे. पावसाने दडी मारल्याने लावणीच्या कामाला विलंब होऊ लागला आहे. यामुळे बळीराजा चातक पक्षाप्रमाणे आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. कालपासून पाऊस समाधानकारक सुरु झाला आहे. भारतीय हवामान खाते, कुलाबा, मुंबई कडून मिळालेल्या माहितीवरून दि. ९ जुलै ते १२ जुलै या कालावधीमध्ये जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. पावसाच्या पुन्हा झालेल्या आगमनाने बळीराजाला दिलासा मिळाला आहे.
राजापूर, खेड तालुक्यांमध्येही शेतजमिनीना उष्मा वाढल्याने भेगा पडायला लागल्याचे वृत्त आपण पहिले, तसेच जून महिन्यात पावसाची हजेरी १०० टक्के असल्याने असल्याने पेरण्याही पूर्ण झाल्या. पण लावणीच्या ऐन वेळी पावसाने दडी मारल्याने उन्हाचा मारा जास्त झाल्याने रोपही पिवळी पडायला लागली होतीत. १० जुलैपासून पावसाची पुन्हा दमदार एन्ट्री होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आणि गुरुवार पासूनच सरीच्या पावसाची सुरुवात झाली. रत्नागिरी जिल्ह्यात गुरुवारी सकाळी पडलेल्या पावसाची १४.९२ मिमी नोंद झाली आहे. त्यामुळे लावणीची कामे पूर्ण करण्यामध्ये शेतकरी गुंतून गेला आहे.