27.7 C
Ratnagiri
Saturday, July 5, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeRatnagiriशेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे दिव्यांगांच्या घोषणांनी अवघे लांजा दणाणले

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे दिव्यांगांच्या घोषणांनी अवघे लांजा दणाणले

तहसील कार्यालय परिसरात जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला.

‘शेतकऱ्यांची शेतकऱ्यांची कर्ज माफी झालीच पाहिजेत…. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे…. दिव्यांगांची पेंशन ६ हजार झालीच पाहिजे…. अपना भिडू बच्चु कडू….’ अशा घोषणांनी दिव्यांग बांधवांनी लांजा तहसीलदार कार्यालय परिसर गुरुवारी दणाणून सोडला, शेतकरी आणि दिव्यांगांच्या विविध प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांचे अमरावतीमध्ये सुरु असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला लांजा तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी एकजूटीने आपला पाठिंबा देत लांजा तहसीलदार यांना यावेळी निवेदन सादर केले. गेल्या ५ दिवसांपासून अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथे प्रहार या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष बच्चु कडू यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. बुधवारी ११ जून रोजी उपोषणाच्या चौथ्या दिवशी बच्चू कडू यांची प्रकृती बिघडल्याने हे आंदोलन चिघळले असून या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी लांजा तालुक्यातील दिव्यांग बांधव गुरुवार १२ जून रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुम ारास लांजा तहसीलदार कार्यालयावर धडकले.

यावेळी त्यांनी तहसील कार्यालय परिसरात जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला. यावेळी बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून लांजा तहसीलदार प्रियांका ढोले यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात बच्चू कडूंच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. लांजा तालुक्यातील दिव्यांग बांधवांचा बच्चू कडू यांच्या या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा असून सरकारने दिव्यांगांच्या तीव्र भावना समजून घेत तातडीने आंदोलनाची दखल घ्यावी, असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, लांजा तहसीलदार प्रियांका ढोले यांना निवेदन देताना प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष आनंद त्रिपाठी यांच्यासह लांजा तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी प्रकाश लांजेकर, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख सुरेश करंबेळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे लांजा तालुका युवक अध्यक्ष बाबा धावणे, पदाधिकारी दाजी गडहिरे, लांजा तालुका लाकूड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष फारुख नेवरेकर, दिव्यांग जनकल्याण संस्थेचे संजय सुर्वे आदींसह इतर दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आंदोलनाला लांजा तालुका शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने आपला पाठिंबा दिला.

RELATED ARTICLES

Most Popular