26.9 C
Ratnagiri
Saturday, August 30, 2025

वाहतूक कोंडीत अडकले राजापूर शहर…

दिवसागणिक वाहनांची आणि वाहने वापरणाऱ्यांची संख्या वाढत...

सवलतीच्या लाभासाठी ‘लालपरी’ला पसंती – रत्नागिरी विभाग

राज्य परिवहन महामंडळातर्फे लाडक्या लालपरीतून प्रवास करणाऱ्या...

दीड दिवसांच्या बाप्पाला भक्तांनी दिला भावपूर्ण निरोप

जिल्ह्यात दीड दिवसांच्या गणेशोत्सवाची गुरूवारी थाटामाटात सांगता...
HomeRatnagiriजिल्ह्यातील शेतकऱ्यांनी 'फार्मर आयडी' काढावा जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ‘फार्मर आयडी’ काढावा जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

पीककर्ज उपलब्ध करून देण्यासाठी नवीन पोर्टलची सुरुवात केली आहे.

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली महसूल, कृषी व ग्रामविकास विभाग यांची आढावा बैठक झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी शेतकरी बांधवांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आणि उत्सवासाठी गावी आलेल्या शेतकऱ्यांना अॅग्रीस्टॅक योजनेत नोंदणी करून फार्मर आयडी काढून घेण्याचे आवाहन केले. पिकविमा, फळपिकविमा योजना, नैसर्गिक आपत्ती पीक नुकसान भरपाई, पीएम किसान योजना आदी लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे तसेच केंद्र शासनाने पीएम किसान योजनेमधील लाभार्थी यांना अॅग्रीस्टॅकमध्ये नोंदणी करणे बंधनकारक केले आहे. त्या अनुषंगाने गणेशोत्सवासाठी गावाला येणाऱ्या गणेशभक्तांनी आणि बाहेरगावी असणाऱ्या शेतकऱ्यांनी अॅग्रीस्टॅक योजनेतील नोंदणी पूर्ण करून फार्मर आयडी काढून घ्यावा. नोंदणीसाठी mhfr.agristack.gov.in या पोर्टलवर शेतकऱ्यांना स्वतः नोंदणी करता येणार आहे तसेच सीएसी केंद्र आणि कृषी विभाग/महसूल विभाग /ग्रामविकास विभागातील अधिकारी/कर्मचारी यांच्यामार्फत ग्रामस्तरावर नोंदणीचे काम सुरू असल्याने त्यांच्याशी संपर्क करून नोंदणी करावी.

केंद्र सरकारमार्फत जनसमर्थ केसीसी पोर्टलद्वारे शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध करून देण्यासाठी नवीन पोर्टलची सुरुवात केली आहे. या पोर्टलमध्ये अॅग्रीस्टॅक डाटा प्रणालीच्या पोर्टलचे एकात्मीकरण केले असून, पात्र शेतकऱ्यांना पारदर्शक सुलभ व कागदविरहित पद्धतीने पीककर्ज मंजुरी करता येणार आहे. या प्रणालीद्वारे पीककर्ज मंजुरीसाठी पात्रता निकष आहेत. त्याची पूर्तता करावी. केवळ वैयक्तिक मालकी असलेल्या शेतकऱ्यांची या मोहिमेसाठी निवड करण्यात करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील इच्छुक व पात्र शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधावा किंवा सीएसीधारकांकडून जनसमर्थ पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular