27.4 C
Ratnagiri
Friday, August 1, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeChiplunआडवली स्थानकावर विद्युत वाहिनीतील बिघाडाने ९ रेल्वेंना विलंब

आडवली स्थानकावर विद्युत वाहिनीतील बिघाडाने ९ रेल्वेंना विलंब

रेल्वे गाड्यांना वीज पुरवठा करणारी ओव्हरहीट विद्युत वाहिनी तुटली.

कोकण रेल्वे मार्गावर वेरवली-निवसर दरम्यान आडवली रेल्वे स्थानकातील ओव्हरहेड इलेक्ट्रिक वायर तुटल्यामुळे शनिवारी (ता. ४) दुपारी कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. तीन तासांच्या प्रयत्नानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात रेल्वेच्या पथकाला यश आले. या प्रकारामुळे दिल्लीच्या दिशेने धावणाऱ्या त्रिवेंद्रम ते निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेससह ९ गाड्यांना विलंब झाला. कोकण रेल्वे मार्गावर सावंतवाडी येथून दिव्याकडे जाणारी एक्स्प्रेस साडेबारा वाजण्याच्या सुमारास आडवली रेल्वे स्थानकात आली असता, अचानक रेल्वे गाड्यांना वीज पुरवठा करणारी ओव्हरहीट विद्युत वाहिनी तुटली. त्यामुळे वीज पुरवठाचखंडित झाल्यामुळे वाहतूक थांबलेली होती. यासंदर्भातील माहिती मिळताच रत्नागिरी येथून आपत्कालीन व्हॅन तातडीने घटनास्थळी रवाना झाली. या पथकाने सुमारे तीन तास प्रयत्न करीत तुटलेली वायर जोडली. त्यानंतर दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास रेल्वे वाहतूक सुरळीत झाली. या कालावधीत अनेक रेल्वे गाड्या ठिकठिकाणी रेल्वेस्थानकात थांबवून ठेवण्यात आलेल्या होत्या.

वाहतूक सुरू झाल्यानंतर आडवली स्थानकातील दिव्याकडे जाणारी एक्स्प्रेस सर्वप्रथम मार्गस्थ झाली. परंतु अनेक गाड्या विलंबाने धावत होत्या. त्यामध्ये निजामुद्दीन ते एर्नाकुलमदरम्यान धावणारी मंगला एक्स्प्रेस, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगावदरम्यान धावणारी जनशताब्दी एक्स्प्रेस, मुंबई- मडगाव तेजस एक्स्प्रेस या गाड्यांसह मांडवी तसेच दिवा सावंतवाडी व सावंतवाडी दिवा या दोन्ही गाड्यांना फटका बसला. दरम्यान, ‘ओव्हर हीट’मुळे ही वायर तुटली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. कोकण रेल्वे मार्गावरील सर्व रेल्वे गाड्यांना इलेक्ट्रीक इंजिन बसविण्यात आलेली आहेत. त्यामुळे सातत्याने या मार्गावर मेंटेनन्सही ठेवला जात असतो, असे कोरे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

RELATED ARTICLES

Most Popular