26.2 C
Ratnagiri
Thursday, October 24, 2024

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई- गोवा बनावटीच्या मद्यासह कोटीचा मुद्देमाल जप्त

रत्नागिरी, दि. २३ (जिमाका)- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर...

या खेळाडूच्या टीम इंडियात पुनरागमनाचे भवितव्य काय…

भारत विरुद्ध न्यूझीलंड पुणे कसोटी आता जवळ...
HomeRatnagiriरस्त्यांमुळे घरात पाणी शिरण्याची भीती, पावसाळ्यातील अडचणी

रस्त्यांमुळे घरात पाणी शिरण्याची भीती, पावसाळ्यातील अडचणी

नागरिकांना त्रास सहन करावा लागणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

रत्नागिरीच्या विकासासाठी रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले. साळवीस्टॉप, मारुती मंदिर ते कोकणनगर येथील टप्प्याचे काँक्रिटीकरण पूर्णही झाले; मात्र काही ठिकाणी बाजूपट्ट्यांचे काम अपूर्ण आहे. त्याचा फटका पावसाळ्यात बसणार आहे. रत्नागिरीची भौगोलिक परिस्थिती पाहता काँक्रिटचे रस्ते उंच झाले आहेत. पावसाचे पाणी या रस्त्यावरून शेजारील दुकानात किंवा घरात शिरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रस्ता उंच आणि गटारे खाली अशी स्थिती ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे. पावसाळ्यापूर्वी तयारी करण्यासाठी प्रशासन कामाला लागलेले होते; पण त्या दृष्टीने नियोजन झालेले नाही.

रत्नागिरी शहरातील साळवीस्टॉप येथून काँक्रिटीकरणाच्या कामाला सुरवात झाली. त्यातील काही काम पूर्ण झाले आहे; मात्र काही अजूनही शिल्लक आहे. आता पाऊस सुरू झाल्यामुळे अपूर्ण कामाच्या ठिकाणी नागरिकांना त्रास सहन करावा लागणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. साळवीस्टॉपपासून अगदी मांडवीपर्यंत भाग उताराचा असल्यामुळे रस्त्यावरील पाणी थेट खाली वाहत येते. काँक्रिटीकरण केल्यानंतर मार्ग मोकळा नसल्यामुळे रस्त्यावरील पाणी दुकान व जुन्या घरांमध्ये शिरेल. साळवीस्टॉप येथील एका नागरिकाने पहिल्या पावसाचा अनुभव लक्षात घेऊन घरासमोर रस्त्यावरील पाणी अडवण्यासाठी गोणपाट लावली आहेत.

हा प्रयत्न नक्कीच केविलवाणा ठरणार आहे. नाचणेरोड, मारुती मंदिर, आरोग्यमंदिर या ठिकाणी अद्यापही बाजूपट्ट्यांचे काम झालेले नाही. मारुती मंदिर येथील बाजूपट्ट्यांचे काम अपूर्णच आहे. दरम्यान, यंदा दमदार पाऊस झाला तर शहरातील मारुती मंदिर, जयस्तंभ, तेलीआळी आणि आठवडा बाजार, रहाटाघर येथे पाणी साचण्याची शक्यता आहे. गेले दोन दिवस झालेल्या पावसाने रहाटाघर येथे रस्त्याला मोठे खड्डे पडले असून, तिथे एसटी वाहनचालकांसह इतर वाहने चालवताना कसरत करावी लागत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular