28.5 C
Ratnagiri
Tuesday, July 8, 2025

पंढरीच्या विठूरायाला अज्ञात भाविकांकडून सोन्याचा पोषाख भेट…

श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या चरणी नाव न...

वणवा मुक्तीसाठी राज्यात जनजागृती मोहीम – मंत्री उदय सामंत

वणवा लागल्यावर नुकसान भरपाई देण्याचा प्रश्न न...

राज मराठी अस्मितेसाठी; उद्धव खुर्चीसाठी एकत्र – मंत्री उदय सामंत

मराठी भाषेच्या मुद्द्यावरून दोन ठाकरे एकत्र आले;...
HomeRatnagiriगणपतीपुळेतील गटारातील सांडपाण्यामुळे विहिरी दूषित

गणपतीपुळेतील गटारातील सांडपाण्यामुळे विहिरी दूषित

पाईप निसटल्यामुळे सांडपाणी जवळच्या विहिरींमध्ये जात आहे.

तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथे कोल्हटकर तिठ्याजवळील विहिरींचे पाणी दूषित झाल्यामुळे संबंधित व्यावसायिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. गणपतीपुळे येथील आपटातिठा ते कोल्हटकर तिठा या मुख्य मार्गालगत गटाराचे काम मागील काही महिन्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आले. या गटारामध्ये गणपतीपुळे येथील परिसरातील काही हॉटेल व्यावसायिकांनी सांडपाण्याची पाईपलाईन जोडल्या आहेत. तेथील पाईप निसटल्यामुळे सांडपाणी जवळच्या विहिरींमध्ये जात आहे तसेच काही ठिकाणी सांडपाणी साचून राहिल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे.

सांडपाण्याच्या दुर्गंधीचा पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे. याचा फटका हॉटेल व्यावसायिकांना बसत आहे. काही लोकांच्या विहिरींचे पाणी मोठ्या प्रमाणात दूषित झाले आहे. त्या ठिकाणी असलेल्या विहिरींचे पाणी स्थानिक हॉटेल व्यावसायिक आपल्या स्वतःच्या कुटुंबांसाठी आणि पर्यटकांसाठी करतात; मात्र सध्या पाणी दूषित झाल्यामुळे संबंधित व्यावसायिकांना मोठा फटका सहन करावा लागत आहे.

याबाबत स्थानिक व्यावसायिकांनी स्थानिक गणपतीपुळे ग्रामपंचायतीकडे पत्रव्यवहार केलेला आहे. अद्याप कुठलीही कार्यवाही झालेली नाही. ग्रामपंचायतीने याबाबत योग्य ती दखल घेऊन कार्यवाही करावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular