20.2 C
Ratnagiri
Saturday, November 15, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeMaharashtraआरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले मोठे विधान

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले मोठे विधान

फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात सिनेमागृह, हॉटेल बार, रेस्टॉरंट तसेच नाट्यगृह पूर्ण क्षमतेने सुरु होऊ शकण्याची शक्यता वर्तवली आहे.

राज्यात कोरोनाच्या  दैनंदिन रुग्णसंख्येमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात घट होताना दिसत आहे. तसेच मृत्यू संख्याही कमी झाल्याने राज्यासाठी हि मोठी दिलासाजनक बाब आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार,  राज्यात गेल्या २४ तासात ६ हजार ४३६ नव्या रुग्णांचे निदान झाले असून, राज्यात एकूण २४ रुग्णांचा मृत्यू ओढवला आहे. तर दिवसभरात १८ हजार ४२३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. या बरोबरच राज्यात आज एकूण १ लाख ०६ हजार ०५९ रुग्णांवर सक्रिय रुग्ण उपचार सुरू आहेत.

देशासह राज्यातील सातत्याने कमी होणाऱ्या कोरोना रूग्णसंख्येमुळे नागरिकांसह प्रशासनाने मोकळा श्वास घेतला आहे. या दरम्यान, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी एक मोठे विधान केले असून,सध्या अनेक कोरोना बाबतचे निर्बंध घालण्यात आले आहेत, मात्र फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात सिनेमागृह, हॉटेल बार, रेस्टॉरंट तसेच नाट्यगृह पूर्ण क्षमतेने सुरु होऊ शकण्याची शक्यता वर्तवली आहे.

राज्यातील कमी होणारी कोरोना रूग्णसंख्या नक्कीच दिलासादायक असून, याच पार्श्वभूमीवर राज्यातील नाट्यगृहे, सिनेमागृह तसेच हॉटेल बार रेस्टॉरंट फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा राज्य सरकारचा कल असल्याचे ते म्हणाले. सध्या हॉटेल, नाट्यगृहे आणि सिनेमागृहे केवळ ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, टोपे यांच्या या विधानामुळे राज्यातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

मागील दोन वर्षापासून कोरोना संक्रमितांची संख्या पाहता, सध्याचं घडीला असणारी संख्या नक्कीच दिलासाजनक आहे. आणि मृत्यूच्या प्रमाणात सुद्धा मोठ्या प्रमाणात घाट झालेली दिसून आल्याने शासनाने कोरोना निर्बंधामध्ये जि सध्या ५०% शिथिलता दिली आहे ती लवकरच पूर्ण १००% शिथीलतेमध्ये बदलण्याचा संकेत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular