27.7 C
Ratnagiri
Saturday, July 12, 2025

शेती संरक्षणासाठी हवे विमा कवच – कृषी विभाग

नैसर्गिक आपत्ती, कीड वा रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये...

गडनरळ ग्रामस्थ ‘वाटद’बाबत सकारात्मक

वाटद एमआयडीसी जमीन भूसंपादनाबाबत आज वैयक्तिक हरकतींवरील...

रत्नागिरीनजीक मिऱ्या येतील उधाणात वाहून जाणाऱ्यास जीवदान

शहराजवळील मिऱ्या समुद्रकिनारी मोठी दुर्घटना होता होता...
HomeChiplunनिर्माल्यावर प्रक्रियेतून साडेतीन टन खतनिर्मिती - चिपळूण पालिकेचा उपक्रम

निर्माल्यावर प्रक्रियेतून साडेतीन टन खतनिर्मिती – चिपळूण पालिकेचा उपक्रम

पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पामध्ये प्रक्रिया सुरू आहे.

वाशिष्ठी नदीतील प्रदूषण रोखण्यासाठी हाती घेतलेल्या निर्माल्यदान चळवळीला शहरात चांगला प्रतिसाद मिळाला. गौरी- गणपती विसर्जनावेळी सुमारे १६०० टन निर्माल्य जमा झाले आहे. पालिकेच्या आरोग्य विभागामार्फत निर्माल्यावर नैसर्गिक प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यापासून सुमारे साडेतीन टन सेंद्रिय खत तयार झाले आहे. चिपळुणात दरवर्षी निर्माल्यदान उपक्रम राबवला जातो. गौरी-गणपती विसर्जनावेळी नदी प्रदूषण टाळण्याचे आवाहन पालिकेने केले होते. पाणी प्रदूषण कमी करण्यासाठी कृत्रिम तलावात गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले.

या प्रसंगी दरवर्षीप्रमाणे यंदाही निर्माल्यदान उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. निर्माल्य विसर्जनामुळे होणारे नदी व अन्य पाणवठ्यांच्या पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेने शहरात २२ ठिकाणी कृत्रिम कुंडांची व्यवस्था केली होती. शहरातील नागरिकांनी व गणेशभक्तांनी स्वंयस्फूर्तीने या उपक्रमात सहभाग घेतला होता. गणेशभक्तांनी तलावात मूर्तीचे विसर्जन केले; मात्र निर्माल्य पालिकेच्या कलशात दान केले. या निर्माल्यावर शिवाजीनगर येथील पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पामध्ये प्रक्रिया सुरू आहे. प्रथमतः निर्माल्याचे वर्गीकरण केल्यानंतर त्याचे बेड तयार केले जाते.

बेडवर बायोक्लिन पावडर टाकून नैसर्गिकरित्या खत तयार केले जाते. मागील पाच वर्षापासून नैसर्गिकरित्या खत तयार करण्याचे काम सुरू आहे. शिवाजीनगर येथील कचरा प्रकल्पातून यापूर्वी गांडूळखत तयार केले जात होते; मात्र आता नैसर्गिक खत तयार केले जात आहे. तयार झालेल्या खताचा वापर शहरातील पालिकेच्या बागांमध्ये केला जातो. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार त्याची विक्री करण्यात येणार आहे. परिणामी, निर्माल्यदान उपक्रमांतून सेंद्रिय खतनिर्मितीला चांगली चालना मिळू लागली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular